धावत्या ट्रॅव्हल्समध्येच चालकांचे आलटून-पालटून जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:45 AM2021-08-28T04:45:50+5:302021-08-28T04:45:50+5:30
सणासुदीच्या काळात प्रवासी वाहतुकीचा हंगाम सुरू झाल्याने एसटी महामंडळ आणि खासगी ट्रॅव्हल्स कंपनीत प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. ...
सणासुदीच्या काळात प्रवासी वाहतुकीचा हंगाम सुरू झाल्याने एसटी महामंडळ आणि खासगी ट्रॅव्हल्स कंपनीत प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. याचा ताण एसटीच्या चालक, वाहकांसह ट्रॅव्हल्स चालक, वाहकांवर कामाचा ताण येतो. त्यात एसटीच्या चालक, वाहकांना कर्तव्याची वेळ निर्धारित असून, हक्काच्या पगारासह इतर शासकीय भत्तेही मिळतात; परंतु खासगी ट्रॅव्हल्स चालकांना मात्र तशा कोणत्याही सुविधा नसतात. नाही म्हणायला रात्रभर गाडी चालवावी लागत असल्याने लांब पल्ल्याच्या अंतरात झोप काढण्यासाठी एक अतिरिक्त चालक सोबत दिला जातो, तर एक क्लीनरही असतो. अशात एक चालक झोपल्यानंतर दुसऱ्या चालकाला बस चालवावी लागते. भूक लागली की धावत्या बसच्या केबिनमध्येच हे चालक आलटून-पालटून जेवण करतात.
०००००००००००००००
वाशिममधून धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स
१) हिंगोली-नागपूर
२) नागपूर-हिंगोली,
३) नागपूर-पुणे
४) पुणे-नागपूर
५) औरंगाबाद-नागपूर,
६) नागपूर-औरंगाबाद
७) हिंगोली-खंडवा
८) खंडवा-हिंगोली
-----------------