ड्रोनद्वारे गावठाणांचे सर्वेक्षण रखडणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:42 AM2021-04-16T04:42:03+5:302021-04-16T04:42:03+5:30
ग्रामीण भागात गावठाणामध्ये राहणाऱ्या व्यक्तींकडे त्यांच्या मिळकतीचे अभिलेख, अधिकृत मालकी हक्काचा पुरावा नसल्याने त्यांना बँक कर्ज मिळविणे किंवा मालमत्ता ...
ग्रामीण भागात गावठाणामध्ये राहणाऱ्या व्यक्तींकडे त्यांच्या मिळकतीचे अभिलेख, अधिकृत मालकी हक्काचा पुरावा नसल्याने त्यांना बँक कर्ज मिळविणे किंवा मालमत्ता हस्तांतरण करताना तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या मिळकतधारकांची मोठी गैरसोय होते. तसेच गावठाणाचे नकाशे, अभिलेख नसल्याने विविध विकास योजना राबविताना ग्रामपंचायतींना सुद्धा अडचणी येतात. कर आकारणी, बांधकाम परवानगी यासारख्या बाबींसाठी सुलभता आणण्यासाठी गावठाणाचे नकाशे उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून गावठाणाचे नकाशे तयार केले जाणार आहेत. याद्वारे प्रत्येक मिळकतीची सीमा निश्चित होईल, तसेच त्याचे नेमके क्षेत्रही माहिती होणार असल्याने मिळकतधारक व ग्रामपंचायत यांना अधिकृत दस्तावेज उपलब्ध होणार आहेत. परंतू सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वेक्षणही रखडण्याची चिन्हे दिसत आहेत.
००