वाशिम जिल्हयात दुष्काळसदृश परिस्थितीत ‘मग्रारोहयो’च्या कामांनाही ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 09:10 PM2017-11-08T21:10:17+5:302017-11-08T21:14:25+5:30

सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार नसल्याने पर्यायाने मजूरांनाही रोजगार मिळणार नाही. अशा स्थितीत शासनाकडून रोजगार मिळणे आवश्यक असताना मग्रारोहयोच्या कामांना ‘ब्रेक’ लागला असून तालुका पातळीवरूनही नवीन कामांची मागणी नसल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.

In the drought-hit situation of Washim district, the work of Magraarohio breaks! | वाशिम जिल्हयात दुष्काळसदृश परिस्थितीत ‘मग्रारोहयो’च्या कामांनाही ब्रेक!

वाशिम जिल्हयात दुष्काळसदृश परिस्थितीत ‘मग्रारोहयो’च्या कामांनाही ब्रेक!

googlenewsNext
ठळक मुद्देमजूरांना रोजगार मिळेनातालुका पातळीवरून नवीन कामांची मागणी नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: यंदा अपु-या पावसामुळे जिल्ह्याच्या बहुतांश भागातील पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार नसल्याने पर्यायाने मजूरांनाही रोजगार मिळणार नाही. अशा स्थितीत शासनाकडून रोजगार मिळणे आवश्यक असताना मग्रारोहयोच्या कामांना ‘ब्रेक’ लागला असून तालुका पातळीवरूनही नवीन कामांची मागणी नसल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली.
ग्रामीण भागातील मजूरांचा शेतातील कामांवरच उदरनिर्वाह चालतो. यंदा मात्र परिस्थिती अत्यंत बिकट असून सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने रब्बी हंगामात ५० टक्के पेरणी देखील होणार नसल्याचे संकेत कृषी विभागाकडून वर्तविले जात आहेत. त्यामुळे मजूरांच्या हाताला काम मिळणार नाही. ही बाब लक्षात घेता, प्रशासकीय पातळीवरून जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू करून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. गटविकास अधिकाºयांनी आपापल्या तालुक्यांमधील अपूर्ण कामे पूर्ण करून घेऊन नवीन कामांची मागणी करणे गरेजेचे आहे. मात्र, सद्यातरी जुनी कामे बंद असून नवीन कामांचीही मागणी नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: In the drought-hit situation of Washim district, the work of Magraarohio breaks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.