पशुलसीकरणासाठी औषध साठा उपलब्ध

By Admin | Published: August 6, 2016 02:07 AM2016-08-06T02:07:43+5:302016-08-06T02:07:43+5:30

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला दोन लाख ७५ हजार इतकी लस प्राप्त.

Drug stocks available for animal husbandry | पशुलसीकरणासाठी औषध साठा उपलब्ध

पशुलसीकरणासाठी औषध साठा उपलब्ध

googlenewsNext

वाशिम, दि. ५ : पावसाळ्याच्या दिवसात लाळखुरकत आजारापासून जनावरांचा बचाव म्हणून जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला दोन लाख ७५ हजार इतकी लस प्राप्त झाल्याची माहिती कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्‍वनाथ सानप यांनी दिली. जिल्ह्यात लाळखुरकत लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. काही ठिकाणी पशुंना या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पशुपालकांना लसीकरण उपलब्ध व्हावे म्हणून एकूण २ लाख ७५ हजार इतकी लस प्राप्त झाली आहे. या लसीचे तालुकास्तरावर वितरण करण्यात आले आहे. लाळखुरकत आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांना लसीकरण करणे आवश्यक आहे. पशुपालकांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी सहा महिन्यांवरील गाय वर्ग व म्हैसवर्गीय जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. लसीकरणासंबंधी कोणतीही तक्रार असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन सभापती विश्‍वनाथ सानप व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. ए. कल्यापुरे यांनी केले. लसीकरण कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशाराही सानप व डॉ. कल्यापुरे यांनी दिला.

Web Title: Drug stocks available for animal husbandry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.