कारमधून एम.डी. हस्तगत; दोन आरोपींना अटक
By सुनील काकडे | Updated: June 19, 2024 19:46 IST2024-06-19T19:46:07+5:302024-06-19T19:46:15+5:30
शहर पोलिसांची कारवाई : ७.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

कारमधून एम.डी. हस्तगत; दोन आरोपींना अटक
सुनील काकडे, वाशिम : अमरावती येथून मानोराकडे जाणाऱ्या कारमधून कारंजा शहर पोलिसांनी एम.डी. नामक अंमली पदार्थ हस्तगत केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करून एकूण ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, समीर खान बशीर खान (३२) आणि सेहबाजोद्दीन अयनोद्दीन (२०) हे मानोरा येथील रहिवासी एम.एच. ०१ डी.ई. ८२३५ क्रमांकाच्या कारमधून एम.डी. ड्रग्स घेवून जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे सापळा रचून कारंजा-अमरावती मार्गावरील समृद्धी महामार्गानजिक कारची झडती घेण्यात आली. यावेळी कारमध्ये ५ ग्रॅम एम.डी. ड्रग्स आढळून आले. त्याची किंमत ३० हजार रुपये असून ७ लाख रुपये किंमतीची कारही पोलिसांनी जप्त केली.