मराठा ‘आरक्षणा’साठी राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर वाजविला ढोल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 05:05 PM2020-10-03T17:05:07+5:302020-10-03T17:05:38+5:30

Maratha reservation सकल मराठा समाजबांधवांतर्फे ढोल बजाओ आंदोलन छेडण्यात आले.

Drums played in front of political party offices for Maratha reservation | मराठा ‘आरक्षणा’साठी राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर वाजविला ढोल !

मराठा ‘आरक्षणा’साठी राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर वाजविला ढोल !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविणे, मराठा आरक्षण मिळण्याच्या मागणीकडे राजकीय पक्षांसह शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३ आॅक्टोबर रोजी वाशिम येथे प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हा कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजबांधवांतर्फे ढोल बजाओ आंदोलन छेडण्यात आले.
मराठा आरक्षणाला न्यायालयात स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला असून क्रांती मोर्चाच्या माध्यमातून विविध आंदोलनाला सुरूवात झाली आहे. घटनातज्ज्ञ व कायदेविषयक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन स्थगिती उठविण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी, मराठा आरक्षण खंडित होऊ न देता पूर्ववत चालू ठेवावे यासह विविध मागण्यांसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी वाशिम येथे अखिल भारतीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व भारतीय जनता पार्टी या प्रमुख चार पक्षाच्या जिल्हा कार्यालयांसमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजेत, असे कसे देत नाहीत, घेतल्याशिवाय राहणार नाही यासह विविध घोषणाबाजी करीत पक्षाच्या नेत्यांचे लक्ष वेधले.

Web Title: Drums played in front of political party offices for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.