दारू पिऊन वाहनचालक तर्राट; काेराेनामुळे कारवाई थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:17+5:302021-07-04T04:27:17+5:30
काेराेनाकाळात दारू मिळत नसल्याने कारवाई थंडावली असल्याचे दिसून येत असले, तरी अनेक ठिकाणी शहरात दारू विक्री झाल्याचे पाेलिसांनीच केलेल्या ...
काेराेनाकाळात दारू मिळत नसल्याने कारवाई थंडावली असल्याचे दिसून येत असले, तरी अनेक ठिकाणी शहरात दारू विक्री झाल्याचे पाेलिसांनीच केलेल्या कारवाईवरून दिसून येते. २०२० मध्ये अनेक ठिकाणी चेकपाेस्ट उभारण्यात आले हाेते. यावेळी सर्वाधिक कारवाई तीन वर्षांच्या तुलनेत झाल्याचे दिसून येते. विशेष बाब म्हणजे जेव्हा काेराेना संसर्ग नव्हता तेव्हा मात्र अल्प प्रमाणात कारवाई झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. २०१९ मध्ये दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या केवळ ३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली हाेती. तर २०२० मध्ये काेराेना संसर्ग असताना तब्बल ५९ जणांवर कारवाई करण्यात आली. तर २०२१ जूनपर्यंत १८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. २०२१ मध्ये काेराेना संसर्ग वाढल्याने कडक निर्बंध लादण्यात आले हाेते. यामुळे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून येते.
..............
ब्रिथ ॲनालायझरचा वापर बंद
काेराेनामुळे संसर्गाची भीती बघता ब्रिथ ॲनालायझरचा वापर बंद करण्यात आला आहे. त्यामुळे काेराेना काळात दारुड्यावरील कारवाईलाही ब्रेक बसल्याचे पाेलीस विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. २०२१ मध्ये केवळ १८ कारवाया करण्यात आल्या.
...........
काेराेना काळामध्ये मद्य विक्री बंद असल्याने दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्यासुद्धा कमी झाली हाेती. पहिल्या २०२० च्या लाटेमध्ये मार्च महिन्यापर्यंत जवळपास दुकाने सुरू असल्याने ५९ जणांवर कारवाई करण्यात आली हाेती. चालू वर्षात कधी लाॅकडाऊन तर कधी कडक निर्बंधात बहुतांश वेळी दारूची दुकाने बंद राहलीत. काही अवैध मार्गाने दारू मिळवून पिणाऱ्या काही वाहनचालकांवरच कारवाई करण्यात आली. जून २०२१ पर्यंत एकूण १८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
- नागेश माेहाेड,
शहर वाहतूक शाखा निरीक्षक, वाशिम