कोरोना लसीकरणासाठी आज ‘ड्राय रन’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:12 AM2021-01-08T06:12:26+5:302021-01-08T06:12:26+5:30
देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस लवकरच येणार असून, त्याअनुषंगाने प्रशासनातर्फे पूर्ण नियोजन ...
देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस लवकरच येणार असून, त्याअनुषंगाने प्रशासनातर्फे पूर्ण नियोजन करण्यात येत आहे. कोरोना लसीकरण कार्यक्रम राबविताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. क्षेत्रीय स्तरावर ‘कोविन अॅप’ किती सोयीस्कर व उपयोगी आहे, हे तपासणे. कोरोना लसीकरणाबाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी, तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरांवरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे, यासाठी यापूर्वी नागपूरसह अन्य काही जिल्ह्यात ‘ड्राय रन’ घेण्यात आला. आता वाशिम जिल्ह्यातही ८ जानेवारी रोजी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. या ड्राय रनमध्ये सत्रस्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर जवळपास २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. लाभार्थ्यांना त्यांच्या कोविन अॅपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर, कोविन अॅप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोविन अॅपमध्ये करण्यात येईल.
‘ड्राय रन’ मोहिमेत लाभार्थ्यांना लसीकरणाची रंगीत तालीम केली जाणार आहे. लसीकरण कार्यक्रम राबविताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येणार आहे.