भरचा आसरा माता तलाव कोरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:46 AM2021-05-25T04:46:35+5:302021-05-25T04:46:35+5:30
.......... कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले वाशिम : गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागाने आरटीपीसीआर, अँटिजन चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. कोरोनाच्या ...
..........
कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागाने आरटीपीसीआर, अँटिजन चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. कोरोनाच्या लक्षणांबाबत युद्धस्तरावर जनजागृती करण्यात आली असून, लक्षणे दिसून आलेल्या नागरिकांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी केले.
...............
मालेगाव शहरात रस्त्यांवर शुकशुकाट
मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ९ मेपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे दवाखाने व मेडिकल वगळता इतर दुकाने, आस्थापना बंद असल्याने दिवसभर शहरात शुकशुकाट दिसून येत आहे.
................
नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
जऊळका रेल्वे : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहर परिसरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारक घराबाहेर पडू नये. नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
................
शिरपुरात पाण्याचा अपव्यय
शिरपूर जैन : शिरपूर (ता.मालेगाव) येथे पाणीपुरवठा केल्यानंतर नागरिकांच्या दुर्लक्षित धोरणामुळे नळ तसेच खुले सोडून दिले जातात. यामुळे पाण्याचा अपव्यय होऊन मुख्य रस्त्यावर असे पाणी साचत आहे.
................
आरोग्यविषयक विविध प्रश्न प्रलंबित
वाशिम : जिल्ह्यात आरोग्यविषयक विविध प्रश्न प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. अनेक रुग्णांना अकोला येथे ‘रेफर’ केले जात आहे. प्रशासनाने आरोग्यविषयक प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.
........................
रस्ता दुभाजकांत वृक्ष लागवड करा
वाशिम : रस्त्याच्या दुतर्फा होणारी वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी दुभाजक टाकण्यात आले आहेत. त्यात लावलेले वृक्ष पाण्याअभावी सुकत आहेत. याकडे लक्ष देण्यासह नव्याने वृक्षलागवड करण्याची मागणी होत आहे.
...................
वाढीव दर कमी करण्याची मागणी
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलासह अन्य स्वरूपातील किराणा साहित्याचे दर वाढले आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट बिघडल्याचा सूर उमटत आहे. दरम्यान, वाढीव दर कमी करण्याची मागणी शिरपूर येथील उषा जाधव यांनी केली आहे.
....................
जलस्रोतांच्या पातळीत झपाट्याने घट
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन तापत आहे. यामुळे बाष्पीभवन होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने सिंचन तलावांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. दुसरीकडे जलस्त्रोतांची पातळीही खालावल्याने पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत आहेत.
.......................
वाशिम येथे सापाला जीवदान
वाशिम : येथील सर्पमित्र मो. समीर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवार, २३ मे रोजी लाखाळा परिसरात साप आढळल्याची माहिती मिळताच त्याठिकाणी हजर होऊन तासभराच्या प्रयत्नानंतर सापाला ताब्यात घेऊन सुरक्षितस्थळी सोडून दिले.
................
मोकाट जनावरांचा वाहतुकीस अडथळा
वाशिम : मालेगाव ते अकोला या प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरे रस्त्यावर ठिय्या मांडून बसत आहेत. यामुळे विशेषत: सकाळच्या सुमारास गर्दी झाल्यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. स्थानिक नगरपंचायतीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
....................
उघड्यावर घाण, लक्ष देण्याची मागणी
वाशिम : ग्रामीण भागात शौचालये उभारण्यात आली आहेत. मात्र, अधिकांश ठिकाणी त्याचा वापरच होत नाही. बहुतांश नागरिक आजही उघड्यावरच शाैचास जात आहेत. अशा लोकांवर कारवाईसाठी गुड माॅर्निंग पथक सक्रिय करण्याची मागणी होत आहे.
......................
वाशिम शहरातील वाहतूक प्रभावित
वाशिम : शहरातील पाटणी चाैक ते शिवाजी चाैक यादरम्यानच्या रस्त्यावर सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास वाहतूक प्रभावित झाली होती. रस्त्यालगत वाहने उभी केली जात असल्याने हा प्रकार नित्याचाच झाला आहे.
..................
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
रिसोड : येथील महावितरण कार्यालयांतर्गत येत असलेल्या रहाटी फिडरवरील कृषीपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
...................
उमरदरी येथे कोरोना लसीकरण
किन्हीराजा : येथून जवळच असलेल्या उमरदरी येथे ३ एप्रिल रोजी ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. या मोहिमेस गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.