डाळिंबाची बाग सुकल्याने शेतक-याचं 20 लाख रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 02:48 PM2018-03-08T14:48:15+5:302018-03-08T14:48:15+5:30
गतवर्षीच्या अपु-या पावसाचा फळपिकांना चांगलाच फटका बसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी डिगांबर गिरी यांची डाळिंबाची बाग पाण्याअभावी सुकल्याने त्यांचे तब्बल 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
वाशिम - गतवर्षीच्या अपु-या पावसाचा फळपिकांना चांगलाच फटका बसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी डिगांबर गिरी यांची डाळिंबाची बाग पाण्याअभावी सुकल्याने त्यांचे तब्बल 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील प्रगतशील शेतकरी डिगांबर गिरी फळपिकांची शेती करतात. त्यांनी यासाठी शेतात भव्य असे शेतततळेही खोदले आहे. याच शेत तळ्याच्या आधारे त्यांनी विक्रमी उत्पादनही घेतले आहे. टरबूज, डाळिंब, पपई आदि फळपिकांसह काकडी, फुलकोबी, सिमला मिरची आदि भाजीपाला पिकेही ते घेत असताज. अंगी असलेली कृतीलता, नियोजन आणि कृषी अधिका-यांच्या मार्गदर्शनात त्यांनी आपल्या शेतात 8 एकर क्षेत्रात डाळिंबाची बाग फुलवित.
या बागेतून पिकविलेली डाळिंब थेट दुबईपर्यंतही विकली आहेत. तथापि, गतवर्षी झालेल्या अपुºया पावसाचा मोठा फटका त्यांना सहन करावा लागला आहे. शेततळ्यात पुरेसा जलसाठाच उरला नसल्याने आपल्या 20 पेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांना या शेततळ्याच्या आधारे जगविणे त्यांना कठीण झाले. यामुळेच त्यांची 8 एकरातील डाळिंबाची फळे धरलेली बाग पूर्णपणे सुकून, त्यांचे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.