अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकास अटक
By Ram.deshpande | Updated: July 26, 2017 21:36 IST2017-07-26T20:27:24+5:302017-07-26T21:36:32+5:30
शिरपूर जैन (वाशिम) - रस्त्यात रेती टाकून आमदार अमित झनक यांच्या वाहनाच्या अपघातास कारणीभूत ठरणाºया मिनीट्रक चालकास शिरपूर पोलिसांनी २५ जुलै रोजीला रात्रीच्या सुमारास डोणगाव येथून अटक केली.

अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) - रस्त्यात रेती टाकून आमदार अमित झनक यांच्या वाहनाच्या अपघातास कारणीभूत ठरणाºया मिनीट्रक चालकास शिरपूर पोलिसांनी २५ जुलै रोजीला रात्रीच्या सुमारास डोणगाव येथून अटक केली.
२५ जून रोजी डोणगाव येथील एमएच ३७ बी ७१७ क्रमांकाचा मिनीट्रक नादुरूस्त झाल्याच्या कारणाहून चालक बुद्धू जुम्मा गवळी याने मिनी ट्रकमधील रेती ही औरंगाबाद-नागपूर द्रुतगती मार्गावरील चांडस गावाजवळ रस्त्यावरच टाकली होती. याच दिवशी सायंकाळच्या वेळी आमदार अमित झनक हे मालेगावकडे येत असताना, समोरच्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात आमदारांचे चारचाकी वाहन रेतीच्या या गंजावरून हुसळले. या अपघातात अमित झनक यांच्यासह चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी अज्ञात रेतीधारकांविरूद्ध गुन्हा नोंदविला होता. तब्बल एका महिन्यानंतर मिनी ट्रकचा शोध लावण्यात शिरपूर पोलिसांना यश आले. एमएच ३७ बी ७१७ क्रमांकाच्या वाहनाचा चालक बुद्धु जुम्मा गवळी यास अटक केली. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.