लोटाबहाद्दरांच्या कृत्यांमुळे गावपुढारी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 07:26 PM2017-09-25T19:26:08+5:302017-09-25T19:26:27+5:30
वाशिम : येत्या आॅक्टोबरमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकी होत असतांना गावात गाव पुढाºयांना फिरतांना लोटा बहाद्दरांच्या कृत्यांमुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र जिल्हयात दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येत्या आॅक्टोबरमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकी होत असतांना गावात गाव पुढाºयांना फिरतांना लोटा बहाद्दरांच्या कृत्यांमुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र जिल्हयात दिसून येत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. इच्छूक उमेदवारांनी गावातील मतदारांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत.या भेटी घेत असतांना गावपुढारी गावात गेल्यानंतर मतदार केवळ उघडयावर हागणदारी जातांना भाऊ खूपच त्रास गुडमॉर्निंग पथकाचा होत असल्याचे सांगताहेत. आता परिस्थिती अशी झाली की, यावर त्यांना काहीही बोलता पण येत नाही. अशा स्थितीत काय राव...घ्या ना एक शौचालय बांधून असे म्हणून इच्छूक उमेदवार मतदारांना समजावून सांगतांना दिसताहेत. यामुळे इच्छूक उमेदवारांची चांगलीच डोकेदुखी वाढलेली दिसून येत आहे.
जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावातील गावपुढारी सक्रीय झाले असून दररोज गावातील चावडयांवर बैठका पार पडतांना दिसून येत आहेत. उमेदवारी अर्ज छाणनी २५ सप्टेंबर रोजी झाली. आता खरी रंगत निवडणुकीत येणार आहे.