विपरित हवामानामुळे वाशिम जिल्ह्यातून शेडनेट ‘हद्दपार’!
By admin | Published: September 28, 2016 01:34 AM2016-09-28T01:34:45+5:302016-09-28T01:34:45+5:30
कृषी विभागाचीही उदासिनता; शेतकरी हतबल.
वाशिम, दि. २७- कधीकाळी जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये ह्यशेडनेटह्ण अर्थात हरितगृहांचे प्रस्थ वाढले होते; मात्र सततच्या विपरित हवामानामुळे सद्य:स्थितीत सर्वच ठिकाणचे शेडनेट बहुतांशी हद्दपार झाले आहेत. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असणार्या वाशिम जिल्ह्याकडे शासनाची पूर्वीपासूनच वक्रदृष्टी राहिलेली आहे. या भागातील शेतकर्यांना शेतीमधील अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत पुरेशी माहिती पुरविण्याकामी कृषी विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी आजही पारंपरिक पिकांच्या फेर्यातच गुरफटलेले आहेत. विपरित हवामानामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना दरवर्षी अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो, ही बाब लक्षात घेऊन कमी क्षेत्रात व प्रतिकुल परिस्थितीत अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने शेतकर्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून ह्यशेडनेटह्ण उभारले. या माध्यमातून वाशिम जिल्ह्यात २0११ ते २0१५ या काळात ५५ ठिकाणी ह्यशेडनेटह्ण उभारल्या गेले. त्यात कोथिंबीर, काकडी, ढोबळी मिरची, सिमला मिरची, कारली यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड करून समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली होती; मात्र अवकाळी पाऊस, वादळी वारा यासह कृषी विभागाच्या उदासिनतेमुळे यातील बहुतांशी ह्यशेडनेटह्ण सध्या नामशेष झाले आहेत.