माझा परिवार विकत घ्या, पण माझी शेती जगवा!; शेतकऱ्याची ठाकरे सरकारला आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:28 PM2019-12-27T12:28:29+5:302019-12-27T12:35:17+5:30

सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील विजय पंडीतराव शेंडगे या शेतकºयाने आपले कुटुंबच विक्रीला काढले.

Due to the anti-farmer policy of the government, the farmer in Kolgaon going sell the family! | माझा परिवार विकत घ्या, पण माझी शेती जगवा!; शेतकऱ्याची ठाकरे सरकारला आर्त हाक

माझा परिवार विकत घ्या, पण माझी शेती जगवा!; शेतकऱ्याची ठाकरे सरकारला आर्त हाक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव (वाशिम) : दुष्काळी परिस्थिती आणि अवकाळी पाऊस यामुळे आर्थीक नुकसान ढासळले असतांना शेतकºयांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. गत तीन वर्षांपासून अस्मानी-सुल्तानी संकटामुळे  शेतीचे, पीकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असतांना सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील विजय पंडीतराव शेंडगे या शेतकºयाने आपले कुटुंबच विक्रीला काढले. त्यांनी चक्क आपल्या शेतात ‘माय बाप सरकार माझा परिवार विकत घ्या, पण माझी शेती जगवा असे फलक लावून संपूर्ण कुटुंबच शेतात जावून बसले आहे.


युती सरकारच्या काळात कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, पीक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळाली नाही. दुष्काळी परिस्थिती आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे हाताशी आलेले पीक गेले आहे. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, अशा परिस्थितीत सरकारकडूनही दिलासा मिळत नसल्याने शेतकरी शेडगे हताश झाले आहेत. २३ डिसेंबरपासून त्यांनी आपल्याला न्याय दयावा याकरिता तहसील कार्यालयासमारे अन्नत्याग आंदोलन केले परंतु एकानेही याकडे ढुंकून पाहीले नसल्याने अखेर सदर निर्णय त्यांनी घेतला असल्याचे सांगितले. आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली असून, सरकारने शेतकरी विरोधी धोरणात बदल करावा, शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे, नुकसानभरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी द्यावी, आर्थिक दिलासा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी शेतातच हे आगळे वेगळे आंदोलन सुरु केले आहे.
 
निवेदनालाही केराची टोपली
गत तीन वर्षांपासून होत असलेले नुकसान पाहता व शेतकºयांसाठी कोणतेही हिताचे निर्णय न घेतल्याने २३ डिसेंबरपासून सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला साधी कोणी भेट न देणे तसेच तहसीलदार रवी काळे यांना निवेदन देऊन त्याची साधी दखल न घेता त्याला केराची टोपली दाखविल्याबद्दल शेतकरी शेंडगे कुटुंबाने प्रशासनाविरुध्दही रोष व्यक्त केला.
 
शेतकरी कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. दरवर्षी उदभवणाºया नुकसानामुळे शेती कशी करावी असा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित होत आहे. त्यात सरकारनेही शेतकºयांना वाºयावर सोडल्याने आपले हे अनोखे आंदोलन आहे.
- विजय शेंडगे
शेतकरी, कोळगाव

Web Title: Due to the anti-farmer policy of the government, the farmer in Kolgaon going sell the family!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.