डिझेलच्या उपलब्धतेनंतर ‘सुजलाम, सुफलाम’ जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 04:19 PM2019-02-11T16:19:11+5:302019-02-11T16:19:16+5:30
वाशिम: डिझेलच्या उपलब्धतेअभावी जिल्ह्यात सुजलाम, सुफलामची कामे खोळंबली होती. जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घेऊन डिझेल उपलब्ध केल्यानंतर चार दिवसांपासून या अभियानातील जलसंधारणाच्या कामांनी पुन्हा वेग धरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: डिझेलच्या उपलब्धतेअभावी जिल्ह्यात सुजलाम, सुफलामची कामे खोळंबली होती. जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घेऊन डिझेल उपलब्ध केल्यानंतर चार दिवसांपासून या अभियानातील जलसंधारणाच्या कामांनी पुन्हा वेग धरला असून, वाशिम तालुक्यातील ब्रम्हा येथे कृषीविभागाच्यावतीने सुरू असलेले नाला खोलीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
राज्यशासन आणि बीजेएसच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानाच्या कामांत डिझेल उपलब्ध होत नसल्याने खोडा निर्माण झाला होता. त्यामुळेच बीजेएसने उपलब्ध केलेल्या मशीनही उभ्या राहिल्या होत्या. ही समस्या कृषी विभाग आणि महसूल विभागासह संबंधित विभागांनी जिल्हाधिकाºयांकडे मांडल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी जलसंधारणाची कामे थांबू नयेत म्हणून तहसीलस्तरावर सुचना केल्या. त्या सुचनानुसार वाशिमच्या तहसीलदारांसह इतर ठिकाणी डिझेल उपलब्ध करण्यास तहसीलदारांनी पुढाकार घेतला. त्यामुळे सुजलाम, सुफलामची कामे पुन्हा जोरात सुरू झाली आहेत. यात ढाळीच्या बांधांची कामे करण्यात येत असून, वाशिम तालुक्यातील ब्रम्हा येथे आठवडाभरापूर्वी सुरू करण्यात आलेले नाला खोलीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी बीजेएसकडून एक पोकलन मशीनही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी कृषी सहाय्यक सुनील एकाडे, कृषी पर्यवेक्षक मधुकर राऊत, मंडळ कृषी अधिकारी सुभाष उलेमाले हे परिश्रम घेत आहेत. त्याशिवाय देवठाणा बु. येथे कृषी सहाय्यक मिनाक्षी तायडे, कृषी पर्यवेक्षक प्रवीण उलेमाले, मंडळ कृषी अधिकारी श्री सुभाष उलेमाले यांच्या मार्गदर्शनात ढाळीच्या बांधाचे काम आणि चिखली येथे कृषी सहाय्यक मधुकर दंडे, मंडळ कृषी अधिकारी अनिल कंकाळ यांच्या मार्गदर्शनात डीप सीसीटीचे काम करण्यात येत आहे.