दुष्काळी परिस्थितीमुळे सोन्याची विक्री निम्म्यावर!
By admin | Published: November 11, 2015 01:45 AM2015-11-11T01:45:04+5:302015-11-11T01:45:04+5:30
गतवर्षी वाशिम येथे धनत्रयोदशीला यावर्षी केवळ ७५ लाखांची विक्री.
वाशिम : दीपावलीत धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी मोठय़ा प्रमाणात केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची खरेदी करण्यास शुभ मानले जात असल्याने अनेक जण सोन्याची थोडी फार का होईना, खरेदी करताना दिसून येते. यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने यावर परिणाम जाणवला असून, धनत्रयोदशीला ७५ लाख रुपयांच्या जवळपास विक्री झाल्याचे दिसून आले. हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण दिवाळी. याच दिवशी नवनवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. याही दिवाळीत कोट्यवधींची खरेदी अपेक्षित असताना पीक परिस्थितीचा फटका या सणाला बसला. २0१३ च्या दिवाळीमध्ये २६ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. त्या तुलनेत २0१४ मध्ये १५ कोटींच्या जवळपास उलाढाल, तर यावर्षी दिवाळीत विविध व्यावसायिकांनी आपल्या प्रतिष्ठानांमध्ये भरगच्च माल भरला; परंतु अपेक्षित व्यवसाय न झाल्याने या दिवाळीत व्यावसायिकांचे दिवाळे निघाल्याचे दिसून येत आहे. धनत्रयोदशीनिमित्त सोन्या-चांदीची खरेदीची माहिती जाणून घेतली असता वाशिमध्ये असलेल्या ५0 दुकानांमधून ७५ लाख रुपयांच्या जवळपास खरेदी झाल्याची माहिती पुढे आली. गत दोन वर्षांपासून दिपावलीच्या खरेदीवर परिणाम जाणवत असल्याचे दुकानदार सांगत आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येवर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली