रस्त्यांच्या कडा खचल्याने अपघातांची शक्यता! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 03:11 PM2018-07-06T15:11:42+5:302018-07-06T15:12:53+5:30

बहुतांश रस्त्यांच्या कडा (साईडपट्टी) उघड्या पडल्यामुळे विशेषत: दुचाकीधारकांना त्रास सहन करावा लागत असून वाहन घसरून अपघातांची शक्यता बळावल्याचे दिसून येत आहे.

Due to the edges of roads, the possibility of accidents! | रस्त्यांच्या कडा खचल्याने अपघातांची शक्यता! 

रस्त्यांच्या कडा खचल्याने अपघातांची शक्यता! 

Next
ठळक मुद्देबहुतांश रस्त्यांच्या कडा व्यवस्थितरित्या दाबण्यात न आल्याने त्या खचून गेल्या आहेत. सद्या सुरू असलेल्या पावसाळ्याच्या दिवसांमुळे ही समस्या अधिकच बिकट झाली.

अनसिंग (वाशिम) : जिल्ह्यातील ग्रामीण भागाला जोडल्या जाणाºया तुलनेने कमी रुंदीच्या रस्त्यांना सद्या वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. बहुतांश रस्त्यांच्या कडा (साईडपट्टी) उघड्या पडल्यामुळे विशेषत: दुचाकीधारकांना त्रास सहन करावा लागत असून वाहन घसरून अपघातांची शक्यता बळावल्याचे दिसून येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे करण्यात आली. तथापि, कुठल्याही रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कडा मुरूमाने भरणे बंधनकारक आहे. मात्र, अरूंद स्वरूपातील बहुतांश रस्त्यांच्या कडा व्यवस्थितरित्या दाबण्यात न आल्याने त्या खचून गेल्या आहेत. सद्या सुरू असलेल्या पावसाळ्याच्या दिवसांमुळे ही समस्या अधिकच बिकट झाली असून समोरून येणाºया वाहनास वाट देताना दुचाकी रस्त्यावरून घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित त्या-त्या विभागांनी याकडे लक्ष पुरवून रस्त्याच्या कडा भरून घेण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

Web Title: Due to the edges of roads, the possibility of accidents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.