भिंतीवर वृक्ष वाढल्याने खंडाळा सिंचन प्रकल्पाचे असित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 04:19 PM2018-05-18T16:19:13+5:302018-05-18T16:19:13+5:30

देपुळ - ल.पा.वि.वाशिमच्य अखत्यारीत येणाºया खंडाळा खुर्द, लघु प्रकल्पाच्या भिंतीवर वृक्ष वाढल्याने, भिंतीवरील वाहतुक रस्त्यामुळे उखडलेली पिंसीच यामळे १९६५ साली स्थापन झालेल्या या सिंचन प्रकल्पाचे असित्व धोक्यात आले आहे.

Due to the increase of tree on the wall, the danger of the Khandala irrigation project is in danger | भिंतीवर वृक्ष वाढल्याने खंडाळा सिंचन प्रकल्पाचे असित्व धोक्यात

भिंतीवर वृक्ष वाढल्याने खंडाळा सिंचन प्रकल्पाचे असित्व धोक्यात

googlenewsNext
ठळक मुद्देसिंचन प्रकल्पाच्या भिंतीवर मोठमोठे वृक्ष वाढलेले असुन याच भिंतीवरुन वाहतुक रस्ता असल्याने भिंतीची पिचींग उखडलेले आहे. सरपंचानी लेखी कळवुन सुध्दा यावर कोणतीच कार्यवाही न करणे ही बाबत खेदजनक आहे.

देपुळ - ल.पा.वि.वाशिमच्य अखत्यारीत येणाºया खंडाळा खुर्द, लघु प्रकल्पाच्या भिंतीवर वृक्ष वाढल्याने, भिंतीवरील वाहतुक रस्त्यामुळे उखडलेली पिंसीच यामळे १९६५ साली स्थापन झालेल्या या सिंचन प्रकल्पाचे असित्व धोक्यात आले आहे. या प्रकल्पाच्या भिंतीवरील वृक्षतोड करावी, उखडलेली पिचींग दुरुस्त करावी, तसेच भिंतीवरील रस्ता बंद करुन पर्यायी रस्ता तयार करावा, अशी मागणी खंडाळा खुर्दचे सरपंच रामहरी सावके यांनी कार्यकारी अभियंता ल.पा.वि.यांच्याकडे मागील २० दिवसापुर्वी केली. परंतु याची दखल घेतल्या गेली नाही.

२५० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या खंडाळा खुर्द सिंचन प्रकल्पाच्या भिंतीवर मोठमोठे वृक्ष वाढलेले असुन याच भिंतीवरुन वाहतुक रस्ता असल्याने भिंतीची पिचींग उखडलेले आहे. त्यामुळे हे सिंचन प्रकल्प के व्हा फुटेल हे सांगता येत नाही. अश्ी परिस्थिती असतांना संबंधीत विभागाच्या कर्मचारी अधिकाºयांचे दुर्लक्ष असणे ही बाब दुर्देवी  आहे.  तर सरपंचानी लेखी कळवुन सुध्दा यावर कोणतीच कार्यवाही न करणे ही बाबत खेदजनक आहे. हे धरण फुटुन वित्त आणि जिवीतहानी झाल्यास जबाब कोणाची राहणार आहे. तरी  खंडाळा खुर्द प्रकल्पाच्या भिंतीवरील वृक्ष तोडण्याचे तथा पर्यायी रस्ता देवुन पिचींग लावण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी सरपंच रामहरी सावके यांनी केली आहे.

Web Title: Due to the increase of tree on the wall, the danger of the Khandala irrigation project is in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम