वाढते तापमान, पाणीटंचाईमुळे दुधाच्या उत्पादनात घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 06:56 PM2018-03-26T18:56:48+5:302018-03-26T18:56:48+5:30
वाशिम : उन्हाचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले असून, सोमवार, २६ मार्च रोजी वाशिमचे तापमान ३९.४ अंश सेल्सियस नोंदविले गेले. अशातच गावागावांत भीषण पाणीटंचाईनेही तोंड वर काढले आहे.
वाशिम : उन्हाचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले असून, सोमवार, २६ मार्च रोजी वाशिमचे तापमान ३९.४ अंश सेल्सियस नोंदविले गेले. अशातच गावागावांत भीषण पाणीटंचाईनेही तोंड वर काढले आहे. त्याचा थेट परिणाम दुधाळ जनावरांवर होत असून, दुधाच्या सरासरी उत्पादनात सुमारे २५ टक्के घट आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यमानात ३० टक्के घट झाली. यामुळे ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात चाºयाचीही उगवण झाली नाही. सोयाबिनचे उत्पन्न घटल्याने यापासून मिळणाºया कुटाराचे प्रमाणही तुलनेने कमीच राहिले. दुसरीकडे दुधाळ जनावरांचे मुख्य खाद्य म्हणून ओळख असलेल्या ढेपीचे दरही गगणाला भिडले आहेत. उद्भवलेल्या या विविध संकटांमुळे पशूपालक अक्षरश: जेरीस आले असतानाच यंदा लवकरच पाणीटंचाई उद्भवल्याने दुधाच्या सरासरी उत्पादनात सुमारे २५ टक्क्याने घट झाली असून फॅट, एस.एन.एफ.वरही त्याचा विपरित परिणाम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जनावरांच्या प्रजनन प्रक्रियेतही वाढत्या उन्हामुळे आणि पाणीटंचाईमुळे विविध स्वरूपातील अडथळे निर्माण होत आहेत. या संकटामुळे पशुपालक पुरते वैतागले असून बाजारात दुधाळ जनावरांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांमध्ये चारा छावण्या उभारून पाणीटंचाई निवारणार्थ प्रभावी उपाययोजना कराव्या, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.