महामार्गाचे पाणी घरात शिरल्यामुळे झोडगा बु. येथील गावकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:45+5:302021-07-17T04:30:45+5:30
पांगरी नवघरे : विकासाला चालना मिळावी, तसेच रस्ता अपघातातील प्रमाण कमी होण्यासाठी या अकोला-नांदेड या राष्ट्रीय ...
पांगरी
नवघरे : विकासाला चालना मिळावी, तसेच रस्ता अपघातातील प्रमाण कमी होण्यासाठी या अकोला-नांदेड या राष्ट्रीय महामार्गाची स्थापना करण्यात आली असून, कामही तितकेच वेगवान पद्धती चालू आहे, परंतु नियाेजनबद्ध काम नसल्याचा फटका झाेडगा बु. गावकऱ्यांना बसला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरून माेठ्या प्रमाणात झाले आहे.
अकोला नांदेड महामार्ग या कामाचे जवळपास पाचशे कोटी रुपयांचे टेंडर हे गुजरातच्या मोंटी कार्लो या कंपनीला दिले आहे. काही दिवसांपूर्वीच नियमानुसार काम हाेत नसल्याने शिवसेनेच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले हाेते. पांगरी गावावरून मोठ्या प्रमाणामध्ये गौणखनिज वाहतूक केल्यामुळे या रस्त्याची वाट लागली आहे. १४ जुलै राेजी झालेल्या पावसामुळे झोडगा बुद्रुक येथील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे डाळी व अन्नधान्य याचे प्रचंड नुकसान झाले असून, कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकरी करीत आहेत. झाेडगा येथील नामदेव आवटे, पुरुषोत्तम आवटे, मोतीराम आवटे, पूर्ण आवटे यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यापूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा पाण्याच्या प्रवाहाला, तसेच नालीचा प्रश्न मार्गी लावण्याचे सांगितले. ते न केल्यानेच आजच्या घडीला झाेडगावासीयांच्या घरात पाणी शिरले.
-----------
प्रत्येकाकडे लक्ष देणे अशक्य
मोंटाे कार्लो या अकोला नांदेड हायवे वरील कंपनीच्या सुपरवायझर शर्मा यांच्यामते, एवढ्या मोठ्या कामावर प्रत्येकाकडे लक्ष देणे कठीण आहे. संबंधित कामाचे देखरेख करून मुरुम टाकण्यात येईल, परंतु काेणतेच आश्वासन पूर्ण न केल्याने ग्रामस्थांना नुकसानास सामाेरे जावे लागले.