उच्चशिक्षणाअभावी गुणवत्तेत घसरण !
By admin | Published: August 3, 2015 12:58 AM2015-08-03T00:58:00+5:302015-08-03T00:58:00+5:30
लोकमत परिचर्चेतील सूर; वाशिम जिल्ह्यात शासकीय महाविद्यालयांची वानवा.
वाशिम : जिल्ह्यात अद्याप वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी यासह इतर अभ्यासक्रमांमधील उच्चशिक्षण पुरविणार्या शासकीय महाविद्यालयांची मुहूर्तमेढही रोवल्या गेलेली नाही. यासह एम पीएससी, युपीएससी या स्पर्धात्मक परिक्षांसंबंधी विद्यार्थ्यांंंना योग्य मार्गदर्शन मिळणे कठीण झाल्याने त्यांची प्रचंड हेळसांड होत आहे. जिल्ह्यातील विद्यमान आमदार, खासदार तथा इतर ने तेमंडळींनी केवळ पोकळ आश्वासनांची खैरात करण्याएैवजी विद्यार्थ्यांंंना जाणवणारी ही अडचण लक्षात घेवून जिल्ह्यात शासकीय महाविद्यालये कशी निर्माण होतील, याकडे लक्ष पुरवायला हवे. शासनस्तरावरुन ही उपलब्धी जिल्ह्यात खेचून आणण्याकरिता सामाजिक संघटनांसोबतच पुढार्यांनीही पुढाकार घ्यावा, असा सूर लोकमतने रविवार, २ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या परिचर्चेत सहभागी युवकांनी काढला.