योग्य मार्गदर्शनाअभावी शेतीपूरक जोडधंद्यांची वानवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:51 AM2017-10-11T01:51:16+5:302017-10-11T01:51:37+5:30
वाशिम: पारंपरिक पीक पद्धतीवर विसंबून राहणार्या जिल्ह्यातील शेतकर्यांना प्रतिकुल हवामान आणि पावसाच्या दग्याफटक्यामुळे बहुतांशी नापिकीचे संकट सोसावे लागत आहे. दुसरीकडे जनजागृतीबाबत कृषी विभागाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे शेतीपुरक जोडधंदेही विशेष तग धरू शकले नाहीत. परिणामी, शेतकर्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

पूर्णत: निसर्गावर विसंबून असलेली तथा हंगामनिहाय पारंपरिक पीक पद्धतीनुसार शेती कसत असताना नापिकी ओढवत असल्याचा अनुभव गेल्या ४ ते ५ वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकर्यांना येत आहे. यातून उद्भवणार्या आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी शेतीपुरक जोडधंदे फायदेशीर ठरू शकतात; मात्र जिल्ह्यात डेअरी फार्मीग व मिल्क प्रोससींग प्रॉडक्टस, पोल्ट्री, शेळीपालन, फुड प्रोसेसींग, ईमू-पालन, बटेर पालन, ससे पालन, छोट्या स्वरूपातील डाळ मिल उद्योग, मधू-मक्षिका पालन, मत्स्य व्यवसाय, भाजीपाला डिहायड्रेशन (सुकविणे), अळींबी उत्पादन, मशरुम उत्पादन, रेशीम उद्योग, दुग्धोत्पादन यापैकी कुठलाच व्यवसाय तग धरू शकला नाही. कृषी विभागाचे दुर्लक्षित धोरण यासाठी कारणीभूत मानले जात आहे.
शेतीला जोडधंदा ही काळाची गरज असून त्यासंबंधी वेळोवेळी शेतकर्यांचे उद्बोधन केले जाते; मात्र गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटल्यामुळे शेतकर्यांमध्येही जोडधंदे उभारण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. कृषी विभागाचे मात्र प्रयत्न सुरूच आहेत.
- दत्तात्रय गावसाने
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी