पावसाअभावी पिके सुकू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:44+5:302021-07-07T04:51:44+5:30
मालेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्र लागताच खरिपातील कापूस, हळद, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी वाणांची पेरणी केली. पेरणी ...
मालेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्र लागताच खरिपातील कापूस, हळद, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी वाणांची पेरणी केली. पेरणी झाल्यानंतर पिकांची उगवण चांगली झाली; परंतु गत काही दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे पिके सुकू लागली आहेत. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. सुरुवातीला बाजारामध्ये बियाणे उपलब्ध असूनही जादा दराने विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यातच दुबार पेरणीचे संकट आल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतात पाऊस नसल्यामुळे देवाकडे धाव घेऊन 'आता तरी देवा मला पावशील का, अन् पावसाची वाट दावशील का? असे शेतकरी राजा म्हणायला लागला आहे. येत्या तीन, चार दिवसांत पाऊस झाला नाही, तर अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे.