महावितरणच्या भारनियमनामुळे रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 04:38 PM2018-10-14T16:38:51+5:302018-10-14T16:39:17+5:30

वाशिम : ऐन रब्बी हंगामाच्या पेरणी काळातच महावितरणने भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी निर्माण झाल्या असून, आता या भारनियमनामुळे रब्बी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Due to loadshading of MSEDCL, the rabi area is expected to decrease | महावितरणच्या भारनियमनामुळे रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता

महावितरणच्या भारनियमनामुळे रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ऐन रब्बी हंगामाच्या पेरणी काळातच महावितरणने भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनात अडचणी निर्माण झाल्या असून, आता या भारनियमनामुळे रब्बी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम वºहाडातील शेतकºयांनी रब्बीसाठी मशागत केली; परंतु भारनियमनामुळे पाणी देणे अशक्य असल्याने त्यांनी पेरणी थांबविल्याचे दिसत आहे.
राज्यात विजेची उपलब्धता १६००० ते १७००० मेगावॅट एवढी असताना महावितरणची वीजेची मागणी १९५०० मेगावॅटवर पोहोचली आहे. त्यामुळे तब्बल २००० ते २५०० मेगावॅट वीजेची तुट निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणकडून जी-१, जी-२ आणि जी-३ या गटांत भारनियमन करण्यात करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या तिन्ही गटांत वीजहानी मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळेच भारनियमन लागू करण्यात आले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसत आहे. सद्यस्थितीत आठवड्यात तीन दिवस रात्री आणि दिन दिवस दिवसाच्या वेळेत भारनियमन करण्यात येत आहे. निर्धारित कार्यक्रमानुसार तीन दिवस ८ तास आणि चार दिवस १० असे आलटून पालटून भारनियन सुरू असताना कृषीपंपावर अतिरिक्त भारनियमन करण्याच्या सुचनाच विभागीय कार्यालयांना वरिष्ठस्तरावर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारनियनम १४ तासांपेक्षा अधिक होत आहे. ऐन रब्बी हंगामाच्या सुुरुवातीलाच भारनियमन करण्यात येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पश्चिम वºहाडात यंदा पाणी उपलब्ध असतानाही भारनियमनामुळे त्याचा वापर करणे अशक्य असल्याने अनेक शेतकºयांनी रब्बीसाठी मशागत करूनही पेरणीस सुरुवात केली नाही. पिकांना योग्य वेळेत पाणी देणे शक्य न झाल्यास मोठे नुकसान होण्याची भिती असल्याने यंदा रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकºयांना सिंचन करण्यात अडचणी येऊ नये म्हणून भारनियमनाच्या वेळेत बदल करण्याबाबत वरिष्ठस्तरावरून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. राज्यात विजेचा तुटवडा असल्याने भारनियमन कमी करण्याबाबत मात्र काही सांगता येणार नाही.
-व्ही. बी. बेथारिया
अधीक्षक अभियंता,
महावितरण, वाशिम

 महावितरणने ऐन रब्बी हंगामातच भारनियमन सुरू केले आहे. यामुळे पेरणी केलेल्या हरभरा, गहू पिकाला पाणी देणे अशक्य झाले आहे. या भारनियमनामुळेच पाणी असतानाही काही शेतकरी रब्बीची पेरणी करण्यास धजावत नसल्याने भारनियमन कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
-संतोष गंगावणे
शेतकरी, देपुळ (वाशिम)

Web Title: Due to loadshading of MSEDCL, the rabi area is expected to decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.