‘लॉकडाऊन’मुळे रोजी गेली; रोटी देणार ‘शिवभोजन’ थाळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:39 AM2021-04-15T04:39:52+5:302021-04-15T04:39:52+5:30
वाशिम : राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत निर्बंध कठोर केले असून, या दरम्यान शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली आहे. ...
वाशिम : राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत निर्बंध कठोर केले असून, या दरम्यान शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील १५०० जणांना होणार आहे.
गरीब आणि गरजूंना फक्त १० रुपयांत जेवणाची थाळी देणाऱ्या 'शिवभोजन' योजनेची २६ जानेवारी २०२० पासून राज्यभरात अंमलबजावणी झाली आहे. त्यानंतर या थाळीची किंमत पाच रुपये करण्यात आली. गतवर्षीदेखील लॉकडाऊनदरम्यान थाळीेचे वितरण गरजू लाभाथींना करण्यात आले होते. वाशिम शहरात पाच शिवभोजन केंद्र असून, उर्वरीत रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा अशा पाच शहरात प्रत्येकी दोन याप्रमाणे दहा केंद्र आहेत. जिल्हयात एकूण १५ केंद्र असून, लाभार्थी संख्या १५०० अशी आहे. शिवभोजन योजनेंतर्गत भोजनालयात प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरण असलेली थाळी देण्यात येणार आहे.
०००
जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र १५
दररोज किती जण घेतात लाभ १५००
०००
बॉक्स
१५०० जणांना मिळतो दररोज लाभ
जिल्ह्यातील १५ केंद्रात दररोज १५०० थाळींचे वितरण केले जाते. आता मिनी लॉकडाऊनसारखी परिस्थिती असल्याने भोजनासंदर्भात गोरगरीब नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्यात येणार आहे.
या शिवभोजन थाळीचा मोफत लाभ प्रत्येक केंद्रात १०० या प्रमाणे १५०० जणांना मिळणार आहे.
००
कोट बॉक्स
गोरगरीब लाभार्थींसाठी शिवभोजन योजना वरदान ठरत आहे. मिनी लॉकडाऊनमध्ये कामधंदा मिळणार नसल्याने पोट भरायचे कसे? हा प्रश्न आहे. मोफत जेवन मिळणार असल्याने पोटापाण्याचा प्रश्न तुर्तास मिटला आहे.
- तुकाराम गवई
0000
शिवभोजन योजनेंतर्गत थाळीचा लाभ मोफत मिळणार असल्याने गोरगरीब नागरिकांची थोडीफार सोय झाली आहे. मिनी लॉकडाऊनदरम्यान शिवभोजन केंद्र व लाभार्थी संख्या वाढविली तर याचा लाभ अनेकांना मिळू शकेल.
- ज्ञानबा गोडघासे
००
शिवभोजन योजनेचा लाभ मोफत मिळणार आहे. वाशिम शहरात शिवभोजन केंद्रांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे.
- विठ्ठलराव कांबळे