पांदन रस्त्याची दुरवस्थेमुळे शेतकर्यांचे चिखलातून मार्गक्रमण
By admin | Published: June 17, 2017 07:40 PM2017-06-17T19:40:35+5:302017-06-17T19:40:35+5:30
शेलगाव-सावळापुर पांदन रस्ता पहील्याच पावसात अत्यंत चिखलमय झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेलगाव येथे ५ वषापार्सून मंजूर झालेला व लाखो रुपयाचा ग्रामनीधी खर्च करून शेलगाव ते सावळापुर शेतशिवारा पयर्ंत पांदन रस्ता पहील्याच पावसात अत्यंत चिखलमय झाला असून शेताकडे ये जा करनार्या शेतकर्यांचे अतोनात हाल होत आहेत.
सदर पांदन रस्ता हा गावापासून सावळापुर शेतशिवारा पयर्ंत विकसीत करण्यासाठी मंजुरी मिळाली असुन अद्यापही सदर रस्ता पूर्णत्वास आला नाही. गेल्या दोन वषापार्सून रस्त्याचे काम सुरु झाले होते परंतु मधातच काम बंद पडल्याने रस्त्यावर टाकलेला मुरुम आणि गीट्टीची व्यवस्थीत दबाई न झाल्याने रस्त्यावर सर्वत्र मोठे मोठे अनुचिकदार दगड बाहेर पडल्याने वाटसरुना पावसाळ्यात चालने कठीन होते. गावातील मंजूर पांदन रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शेतकर्यांचे होणारे हाल टाळावे अशी मागणी गावकर्यांच्या वतीने करण्यात येत आहे.