अर्धवट कामामुळे मिर्झापूर-शिरपूर रस्ता गेला धरणाच्या पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:22 PM2018-06-29T15:22:38+5:302018-06-29T15:24:00+5:30
शिरपूर: मालेगाव तालुक्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मिर्झापूर प्रकल्पाचे काम करीत असताना मिर्झापूर-शिरपूर हा रस्ता बुडित क्षेत्रात गेला, तर नव्या रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने हा रस्ताही धरणाच्या पाण्यातच गेला आहे.
शिरपूर: मालेगाव तालुक्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मिर्झापूर प्रकल्पाचे काम करीत असताना मिर्झापूर-शिरपूर हा रस्ता बुडित क्षेत्रात गेला, तर नव्या रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने हा रस्ताही धरणाच्या पाण्यातच गेला आहे. त्यामुळे या मार्गावर दोन्ही गावांच्या ग्रामस्थांना वहिवाट करणे कठीण झाले आहे.
मिर्झापूर परिसरात सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी मिर्झापूर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे परिसरातील ६५० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. परंतु, हा प्रकल्प उभारताना नियोजनबद्ध काम न झाल्याने आता शेतकºयांसह ग्रामस्थांना वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. या प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान शेतकºयांची जमीन अधिग्रहित करण्यात आली. त्याचवेळी मिर्झापूर-शिरपूर हा रस्ताही प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात गेला. हा रस्ता बुडित क्षेत्रात गेल्याने ग्रामस्थ व शेतकºयांच्या वहिवाटीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे या रस्त्याला पर्यायी रस्ता देण्याची मागणी करण्यात आली आणि ती मान्य करून जलसंधारण विभागाने मिर्झापूर-किन्ही घोडमोड हा पर्यायी रस्ताही केला. यासाठी नदीवर पुल उभारण्यात आला; परंतु पावसामुळे रस्त्याची दबाई योग्यपद्धतीने करून त्याचे डांबरीकरण होऊ शकले नाही. आता पावसाळा सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे हा नवा रस्ताही पाण्यातच गेला आहे. या रस्त्यावर वाहनेही चालू शकत नाही आणि पायी मार्गकाढणेही शक्य नाही. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.