शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग, तूर, कुटार जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:37 AM2021-03-14T04:37:03+5:302021-03-14T04:37:03+5:30
प्राप्त माहितीनुसार ब्राम्हणवाडा येथील शेतकरी मंगेश अरुणराव मुंदे यांचा शेतात गोठा आहे. त्या गोठ्यात जवळपास २० ट्राॅली कुटार, १५ ...
प्राप्त माहितीनुसार ब्राम्हणवाडा येथील शेतकरी मंगेश अरुणराव मुंदे यांचा शेतात गोठा आहे. त्या गोठ्यात जवळपास २० ट्राॅली कुटार, १५ क्विंटल तुरीच्या पेंड्या, एक स्प्रिंकलर संच यासह शेतीउपयोगी साहित्य ठेवले होते. १३ मार्च रोजी दुपारच्या दरम्यान मुंदे यांच्या शेतापासून काही अंतरावरील एका शेतात विजेच्या शाॅटसर्किटमुळे ठिणगी पडून आग लागली. व ती आग हळुहळु मुंदे यांच्या शेतातील गोठ्यापर्यंत पोहचली आणि क्षणात आगीने गोठ्यातील साहित्य आपल्या कवेत घेतले. आग लागल्याची माहिती मिळताच मंगरूळपीर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमनदल व स्थानिक रहिवाशांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. या आगीमुळे संबंधित शेतकऱ्याचे जवळपास २ लाखाचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाईपोटी आर्थिक मदत करण्याची मागणी संबंधित शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे.