कंकरवाडी आणि बोरखेडी येथे ग्रामस्थांसाठी खोदल्या कूपनलिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 02:52 PM2018-05-31T14:52:03+5:302018-05-31T14:52:03+5:30
रिसोड : तालुक्यातील कंकरवाडी आणि बोरखेडी येथे निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेत. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस सुनिल कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदून ग्रामस्थांला पाणीटंचाईच्या काळात मोठा दिलासा दिला आहे.
रिसोड : तालुक्यातील कंकरवाडी आणि बोरखेडी येथे निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेत. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस सुनिल कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदून ग्रामस्थांला पाणीटंचाईच्या काळात मोठा दिलासा दिला आहे. त्याशिवाय भर जहागीर येथेही कूपनलिका खोदण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. कंकरवाडी आणि बोरखेडी येथे पाण्याची भीषण टंचाई आहे. आजुबाजुला पाण्याची कुठेही सोय उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पाणी टंंचार्इृचा सामना करावा लागतो. टँकर सुरू करण्याची मागणी असतानाही, हा प्रश्न सुटू शकला नाही. पाणीटंचाईच्या काळात सरकारी मदत न मिळाल्यामुळे गावकºयांची गरज लक्षात घेऊन कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदली असूून, यावर हातपंप बसविण्यात येणार आहे. कंकरवाडी गावाची लोकसंख्या सुमारे सात हजार असून, बोरखेडीची लोकसंख्याही सहा हजार आहे. या दोन्ही गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांचे पाण्याअभावी मोठे हाल होत आहेत. दुष्काळी परिस्थितीत परिसरात जलस्त्रोत आटल्याने ग्रामस्थांना विकतच्या पाण्याने गरजा भागवाव्या लागत आहेत. आता कायंदे यांनी दोन्ही गावांत कूपनलिकांवर हातपंप बसविण्यात येणार असल्याने सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. यापुर्वी त्यांनी कंकरवाडी येथे टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठाही सुरू केला आहे. आता भर जहाँगिर येथेही त्यांनी कंकरवाडी आणि बोरखेडीप्रमाणेच ग्रामस्थांच्या सोयीसाठी स्वखर्चातून कूपनलिका खोदण्याची तयारी केली असून, येत्या काही दिवसांतच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या तिन्ही गावांतील कूपनलिकांवर ते स्वखर्चाने हातपंपह बसविणार आहेत. त्याशिवाय तालुक्यातील ज्या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या गावांतही मोफत पाणी पुरवठा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या हजारो ग्रामस्थांना त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचा मोठा दिलासा मिळू शकणार आहे.