‘तोतया’ पोलिसाला कारंजा लाड पोलिसांनी घेतले ताब्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:44 PM2017-11-26T23:44:29+5:302017-11-26T23:52:44+5:30

पोलिस असल्याची बतावणी करून दोघांना लुटणा-या आजमखान अफजलखान या आरोपीस शहर पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी अटक केली असून त्याच्याकडून सोने-चांदीच्या दागिण्यांसह ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

duplicate Police detained by karanja lad Police! | ‘तोतया’ पोलिसाला कारंजा लाड पोलिसांनी घेतले ताब्यात!

‘तोतया’ पोलिसाला कारंजा लाड पोलिसांनी घेतले ताब्यात!

googlenewsNext
ठळक मुद्देसोने-चांदीच्या दागिण्यांसह ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त विविध कलमांन्वये गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : पोलिस असल्याची बतावणी करून दोघांना लुटणा-या आजमखान अफजलखान (वय ५२ वर्षे, रा. मलकापूर पांग्रा, ता. शिनखेड, जि.बुलडाणा) या आरोपीस शहर पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी अटक केली असून त्याच्याकडून सोने-चांदीच्या दागिण्यांसह ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आजमखानविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी कारंजा शहरातील जयस्तंभ चौक ते बसस्थानकादरम्यान एका अनोळखी इसमाने पोलिस असल्याची बतावणी करून किसन शामराव कथे (वय ८०, रा. हिवरा लाहे) या शेतकºयाची ३३ हजार ५०० रूपयाने फसवणूक केली; तर दुसºया घटनेत २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कारंजा शहरातील सुदर्शन कॉलनीमधील वसंतराव गोंविदराव देसाई (वय ७६) हे कारंजा बायपासवरून स्टेट बँकेकडे पायी जात असताना मी पोलिस खात्यातील साहेब आहे, असे सांगून देसाई यांच्याजवळून नगदी २० हजार ५०० रुपये व ३० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा ५० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. वरील दोन्ही घटनांप्रकरणी कारंजा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले होते. 
दरम्यान, २५ नोव्हेंबर रोजी आजमखान अफजल खान या आरोपीस त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन्ही गुन्ह्यातील रोख रक्कम व सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ५४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई अप्पर पोलिस अधिक्षक सपना गोरे, उपविभागील पोलिस अधीकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनखाली कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार एम.एम बोडखे यांच्या तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक पायघन, सहायक पोलिस उपनिरीक्षक ठोसरे, महाकाळ, राठोड व लडके यांनी केली. 
 

Web Title: duplicate Police detained by karanja lad Police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस