मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी दुर्गा वाहिनी - पुष्पलता अफूणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 10:59 AM2021-02-11T10:59:57+5:302021-02-11T11:00:04+5:30
Lokmat Interview मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी दुर्गा वाहिनी कार्यरत आहे.
वाशिम : मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी दुर्गा वाहिनी मातृशक्ती कार्यरत असून याव्दारे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती लाेकमतने घेतलेल्या मुलाखतीत दुर्गा वाहिनीच्या जिल्हा संयाेजक पुष्पलता अफूणे यांनी दिली.
दुर्गा वाहिनीचा उद्देश काय?
- मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी दुर्गा वाहिनी कार्यरत आहे. यामध्ये मुलींचे शाैर्य शिबीरांचे आयाेजन करुन त्यांना मार्गदर्शन केल्या जाते.
दुर्गा वाहिनीचा बद्दल अधिक काय सांगाल?
- मुलींना सुसंस्कार घडावेत, मुली स्वरक्षण, कुटूबाचे रक्षण, समाजाचे व देशाचेही रक्षण करू शकतील यासाठी शौर्य शिबीर घेतले जाते. भारतीय संस्कृती जतन अन द्रुड करून मजबुत युवासमाज घडवावा हेतू तसेच कुटुंबात स्नेहभाव दृढ व्हावा हा उद्देश समाेर ठेऊन कुटुंब स्नेहमेळाव्यात मान्यवरांचे मार्गदशन केल्या जाते.
मातृपितृ दिन कशाप्रकारे साजरा केला जाताे?
- पाल्यावर संस्कार करणे पालकांची जबाबदारी आहे. १४ फेब्रुवारी हा दिवस अनेकजण व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा करतात, परंतु या दिवशी मातृ-पितृ आणि ज्येष्ठांचा वंदन-पूजन करण्याचा दिवस असल्याने त्यांचे पूजन करुन हा दिवस साजरा केला जावा.
मुलींना या निमित्ताने काय सांगाल?
बारा ते चौदा वर्षा पासून सर्व मुलींनी दुर्गावाहिनी च्या शौर्य शिबीरात सहभागी हाेऊन आत्मनिर्भरतेचे धडे घ्यावे व ईतरांना ही दयावे. देशात एकून लोक संखेच्या पन्नास टक्के सख्यां मुली- महिलाचीं आहे. तर देशातील नविन पिडी घडवन्या पासून देशाच्या रक्षना पर्यंत सर्वागांने सक्षम व्हाव्या.