वाशिम जिल्ह्यात ४८३ ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना
By admin | Published: October 2, 2016 02:26 AM2016-10-02T02:26:29+5:302016-10-02T02:26:29+5:30
नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल.
वाशिम, दि. 0१- जिल्ह्यात शनिवारी ढोल-ताशांच्या निनादात नवदुर्गेचे थाटात व उत्साहात आगमन झाले. तेव्हापासून विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. यावर्षी शहर व ग्रामीण भागात एकूण ४८३ सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांनी दुर्गा आणि शारदा देवीची स्थापना केली आहे. गतवर्षी ४७४ दुर्गोत्सव मंडळांची स्थापना झाली होती. गावातील शांतता, कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, सामाजिक व धार्मिक एकोपा कायम राहावा आणि या उत्सवात सर्वांचा सहभाग लाभावा, या उद्देशाने तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत अनेक गावांत ह्यएक गाव-एक दुर्गाह्ण हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे राबविण्यात येत आहे. पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा ४८३ दुर्गोत्सव मंडळांपैकी २0 मंडळांनी शारदोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. यंदा वाशिम शहरात ४६ आणि ग्रामीण भागात २६, रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत ५२, मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ५१, शिरपूर येथे ३६, मंगरुळपीर तालुक्यात ४८, अनसिंग येथे १४, आसेगाव येथे २१, कारंजा शहरात ३५, तर कारंजा ग्रामीण भागात ५४, मानोरा येथे ४५, तर धनज येथे ३१ दुर्गोत्सव मंडळांनी दुर्गादेवीची स्थापना केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गोत्सव शांततेत पार पाडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. गृहरक्षक दलाच्या महिला व पुरुषांना मदतीसाठी बोलावण्यात आले आहे. वेळ पडल्यास महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या सदस्यांची तसेच शांतता समितीच्या सदस्यांची मदत घेतली जाणार आहे. दरम्यान, दुर्गोत्सवासाठी बाजारपेठेत पूजेच्या विविध साहित्याच्या खरेदीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांंनी एकच गर्दी केली होती.