कोरोनाकाळात जिल्ह्यात लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:36 AM2021-01-21T04:36:48+5:302021-01-21T04:36:48+5:30
देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. एप्रिल ते जून यादरम्यान लाॅकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी झाली. या कालावधीत ...
देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. एप्रिल ते जून यादरम्यान लाॅकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी झाली. या कालावधीत लहाने बालके घरातच होती. शाळाही बंद असल्याने दिवाळीपर्यंत बालके शक्यतोवर घराबाहेर पडली नाही. तसेच मास्कचा नियमित वापर असल्याने अन्य साथीच्या आजारांपासून बालके सुरक्षित राहिली. २०१९ मध्ये डेंग्यू, स्वाइन फ्लू आदी आजारांनी डोके वर काढले होते. २०२० मध्ये डेंग्यू, स्वाइन फ्लूला बालके बळी पडली नसल्याचे दिसून येते. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये बालकांच्या मृत्युसंख्येत घट झाल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये ४७ तर २०२० मध्ये ३४ बालकांचा मृत्यू झाला.
००
कोरोनाकाळात घेतली विशेष दक्षता
कोेरोनाकाळात माता, बालकांनी मास्कचा वापर केला तसेच यादरम्यान घराबाहेर शक्यतोवर कुणी पडले नाही. कोरोनाचा सर्वाधिक धोका बालकांना असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे मातांनी बालकांना घराबाहेर पडू दिले नाही. आरोग्य विभागातर्फेदेखील विविध मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली.
०००
काय म्हणतात चिल्ड्रन स्पेशालिस्ट ..
कोरोनाकाळात मुले शक्यतोवर घरातच होती. मास्कचा वापरही होता. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये डेंग्यू, स्वाइन फ्लू आदी आजारांना मुले बळी पडली नाहीत.
- डाॅ. विजय कानडे
बालरोगतज्ज्ञ, वाशिम
०००
कोरोनाकाळात एप्रिल ते जुलै महिन्यापर्यंत लहाने बालके शक्यतोवर घराबाहेर पडली नाहीत. साथरोग जास्त प्रमाणात उद्भवले नाहीत. मातांनी बालकांची विशेष काळजी घ्यावी.
- डाॅ. किरण बगाडे
बालरोगतज्ज्ञ, वाशिम
००००
अन्य आजाराने मृत्यू
२०१९ मध्ये डेंग्यू, स्वाइन फ्लू, हृदयविकार, डोक्यात ताप जाणे यासह अन्य आजारांनी १४ वर्षाआतील बालकांचे मृत्यू झाले आहेत. २०२० मध्ये कोरोनामुळे अन्य आजार नियंत्रणात होते.
००
जिल्ह्यात ० ते १४ वर्षे वयोगटातील बालकांचे मृत्यू
२०१९ मधील मृत्युसंख्या ४७
२०२० मधील मृत्युसंख्या ३४