सण, उत्सवाच्या काळात फळे महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 04:04 PM2019-09-01T16:04:13+5:302019-09-01T16:04:32+5:30
विविध प्रकारच्या फळांच्या किंमतीत वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) - पवित्र श्रावण महिन्यापासून हिंदू धर्मियांच्या सण, उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर विविध प्रकारच्या फळांच्या किंमतीत वाढ झाली आहे.
श्रावण महिन्यापासून मोठ्या प्रमाणात सण उत्सवाला सुरुवात होते. राखी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, त्यानंतर हरतालिका, गणपती उत्सव व गौरी उत्सव हे एकामागे एक साजरे केले जातात. सण, उत्सवादरम्यान उपवास केले जातात तसेच या दरम्यान फळांना मोठी मागणी असते. या संधीचा फायदा घेत फळ विक्रेत्यांनी फळांच्या किंमतीत भरपूर वाढ केली. एरव्ही २० े २५ रुपये डझन विकली जाणारी केळी तब्बल ५० रुपये डझन विकली जात आहेत. व्यापाºयांनी, विक्रेत्यांनी फळांच्या किमतीत मोठी वाढ केल्याने भाविकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. हरतालिका निमित्त शिरपूर येथे केळीचा भाव ५० रुपये डझन इतका होता. सफरचंद १०० रुपये, डाळिंब १०० रुपये किलो असा चढता भाव बाजारपेठेत होता.