गणेश मिरवणूकीदरम्यान शिरपूरजैन येथे दोन गटात हाणामारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 02:34 PM2018-09-24T14:34:32+5:302018-09-24T14:35:18+5:30

शिरपूरजैन (वाशिम) : गणेश मिरवणूकीदरम्यान जुन्या वादातून येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवार, २३ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली.

During Ganesh clashes in two groups at Shirpur Jain | गणेश मिरवणूकीदरम्यान शिरपूरजैन येथे दोन गटात हाणामारी!

गणेश मिरवणूकीदरम्यान शिरपूरजैन येथे दोन गटात हाणामारी!

googlenewsNext


पोलिसांत परस्परविरूद्ध तक्रारी : आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूरजैन (वाशिम) : गणेश मिरवणूकीदरम्यान जुन्या वादातून येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवार, २३ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरूद्ध दाखल तक्रारींवरून पोलिसांनी दोन्ही गटातील ६० पेक्षा अधिक लोकांवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी आकाश दत्ता इरतकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की ते अध्यक्ष असलेल्या हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक गजानन इरतकर यांच्या घराजवळून जात असताना वैभव चोपडे, रमेश इरतकर, गजानन शंकर भांदुर्गे, सुभाष इरतकर, प्रकाश इरतकर, विठ्ठल इरतकर, आकाश इरतकर, गोपाल चोपडे, निखील इरतकर, राजू इरतकर, गोपाल इरतकर, योगेश वानखेडे, रामू इरतकर, गजानन इरतकर, संजय भांदुर्गे, रवि भांदुर्गे, गजानन कैलास भांदुर्गे, स्वाती गजानन भांदुर्गे, अन्नपूर्णा कैलास भांदुर्गे आदिंनी मंडळातील लोकांवर लाठ्या-काठ्या, दगडाने हल्ला चढविला. लोकांवर मिरचीपूड फेकून शिविगाळ केली. या मारहाणीत दत्ता इरतकर, बबन दशरथ भांदुर्गे, अंकुश विलास भांदुर्गे, लता विजय भांदुर्गे हे जखमी झाले. अशा आशयाच्या आकाश इरतकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद आरोपींविरूद्ध कलम ३२३, ३२४, ३४१, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले.
दुसºया गटाकडून अन्नपूर्णा कैलास भांदुर्गे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की २३ सप्टेंबर रोजी हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाची मिरवणूक इरतकर गल्लीतून येत असताना विजय भांदुर्गे, लक्ष्मण भांदुर्गे, अंकुश भांदुर्गे, मंगेश भांदुर्गे, बाळू उर्फ आकाश इरतकर, लता विजय भांदुर्गे, उषा लक्ष्मण भांदुर्गे यांच्यासह २० ते २५ लोकांनी जुन्या वादावरून मला मारहाण केली, शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुसºया गटातील नमूद आरोपींविरूद्ध कलम ३२३, ३२४, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले.

Web Title: During Ganesh clashes in two groups at Shirpur Jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.