माल वाहतूक वगळता इतर प्रवासासाठी ई-पास आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 11:31 AM2021-05-11T11:31:06+5:302021-05-11T11:31:12+5:30

E-pass News : माल वाहतूक वगळता इतर प्रवासासाठी ई-पास आवश्यक करण्यात आला आहे. 

E-pass required for travel other than freight | माल वाहतूक वगळता इतर प्रवासासाठी ई-पास आवश्यक

माल वाहतूक वगळता इतर प्रवासासाठी ई-पास आवश्यक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले असून, माल वाहतूक वगळता इतर प्रवासासाठी ई-पास आवश्यक करण्यात आला आहे. 
सर्व सार्वजनिक, खासगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहने यांची वाहतूक नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी करता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहणार असून, रुग्णांसाठी रिक्षा व खासगी वाहनास परवानगी आहे. याबाबतचे नियंत्रण वाहतूक पोलीस शाखेने ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या आहेत. मालवाहतूक व रुग्ण वाहतूक करणाऱ्या वाहनांना व शासकीय वाहनांना परवानगीची गरज नाही. मात्र, मालवाहतूक साठा, खतसाठा आदींबाबत फक्त लोडिंग व अनलोडिंग करण्यास परवानगी आहे. इतर कारणांसाठी व आवश्यक वैद्यकीय कारणांसाठी जिल्ह्याबाहेर वाहतूक करावयाची असल्यास वेबसाइटवरून ई-पास काढून वाहतूक करता येणार आहे. या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शहरी भागात नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी तसेच ग्रामीण भागात संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी यांची राहणार आहे. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित तालुक्याचे इंसिडेंट कमांडर म्हणून तहसीलदार व पोलीस विभागाची राहणार आहे. हे आदेश सर्व आस्थापनांना काटेकोरपणे लागू होतील. तसेच कोणत्याही क्षेत्रास कामकाज सुरू ठेवण्यासाठी विशेष परवानगी १५ मेपर्यंत देण्यात येणार नाही. 
सर्व आस्थापनांनी कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी आपापल्या स्तरावरून त्रिसूत्री पद्धतीची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

Web Title: E-pass required for travel other than freight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम