कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया सुलभ करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 07:46 PM2017-09-06T19:46:52+5:302017-09-06T19:47:05+5:30

छत्रपती  शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत आपले सरकार या संकेतस्थळावर कर्जमाफीचे  अर्ज भरण्याकरिता  विविध अडचणी उदभवत आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने ही प्रक्रिया अधिक सुलभ करावी तसेच अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी बुधवारी केली.

Easy payment of online loan waiver! | कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया सुलभ करा !

कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया सुलभ करा !

Next
ठळक मुद्देछत्रपती  शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनाकर्जमाफीचे  अर्ज भरताना विविध अडचणी 

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : छत्रपती  शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत आपले सरकार या संकेतस्थळावर कर्जमाफीचे  अर्ज भरण्याकरिता  विविध अडचणी उदभवत आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने ही प्रक्रिया अधिक सुलभ करावी तसेच अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी बुधवारी केली.
मानोरा हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी नगर पंचायत अस्तित्वात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी ‘कनेक्टीविटी व सर्व्हर डाऊन’च्या समस्येला वैतागले आहेत. कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी कुटंूबासह  शहरातील सेतु सुविधा व अन्य केंद्रात यावे लागत आहे. अनेकवेळा रात्री जागरण करावे लागत आहे. कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता महा-ई सेवा केंद्राकडे काम सोपविले आहे. पंरतु ई महा सेवा यांचेकडे तहसील कार्यालयाचे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर  कामे असल्यामुळे शेतकºयांचे मोफत अर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसल्याचे चित्र मानोºयात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांची पायपीट सुरू आहे. खासगी केंद्राकडे पैसे देऊन अचूक अर्ज भरला जाईल की नाही, याची खात्री नाही. अशा स्थितीत कर्जदार  शेतकरी यांना सन्मान योजना डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येते. काही महिन्यांपूर्वी मृत्यु झालेल्या कर्जदार सभासदाचा अर्ज कसा भरावा याबाबत  स्पष्ट सूचना नाहीत. तसेच वारसाकरिता सुध्दा अर्ज भरण्याकरिता कोणत्याच प्रकारची सुविधा नाही. यासह विविध समस्या उदभवत असल्यामुळे शेकडो  शेतकरी कर्जमाफीचा आॅनलाईन अर्जापासून वंचित राहण्याची भीती अंजार पटेल यांच्यासह शेतकºयांनी निवेदनातून व्यक्त केली. तहसीलदारांना दिलेल्या या  निवेदनाच्या प्रतिलिपी राज्याचे महसूल मंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त आदिंना पाठविण्यात आल्या. 

Web Title: Easy payment of online loan waiver!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.