अद्रक खा; पण कापून अन् जपूनच! कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 08:29 PM2018-02-19T20:29:24+5:302018-02-19T20:39:24+5:30
वाशिम : स्वयंपाकातील भाज्यांमध्ये आणि दिवसभरातील चहामध्ये सर्रास वापरल्या जाणारी अद्रक कुठलीही सुरक्षितता न बाळगता चांगली ठेचून घेतली जाते. मात्र, हा प्रकार एखादवेळी आरोग्यास बाधा पोहचविणारा ठरू शकतो. कारण अद्रकमध्येही कंद खाणा-या अळ्या आढळत असून सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून अद्रक कापून नंतरच ठेचलेली बरी, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ डॉ. भरत गिते यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क

यासंदर्भात डॉ. गिते यांनी सांगितले, की शेतात लागवड करण्यात आलेल्या अद्रकवर कंद पोखरणाºया अथवा कंद खाणा-या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून येतो. अद्रक काढून ती बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यानंतरही ही अळी त्यात अनवधानाने राहू शकते. त्यामुळे सुरक्षितता म्हणून अद्रक बिनधास्तपणे ठेचून वापरण्यापूर्वी ती कापून घेणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह ठरते, असा सल्ला डॉ. गिते यांनी दिला.
हॉटेल व्यावसायिकांनीही सुरक्षितता बाळगणे गरजेचे
घर चालविणाºया महिलांसोबतच भोजनालये, जेवणाच्या हॉटेल्समध्येही साधारणत: अद्रक थेट ठेचून घेण्याची जणू प्रथाच पडलेली आहे. मात्र, कंद खाणाºया अळ्याही त्यासोबत ठेचल्या जाऊ शकत असल्याने आरोग्यास कधीकाळी बाधा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे अद्रकचा वापर करण्यापूर्वी ती प्रथम कापून, पडताळून घेतल्यानंतरच वापर करणे फायद्याचे ठरू शकते.