शेतकरी कुटूंबांचे होणार आर्थिक सर्वेक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 06:31 PM2019-01-29T18:31:11+5:302019-01-29T18:32:10+5:30
राष्ट्रीय नमुना पाहणी उपक्रम : तपशीलवार माहिती गोळा केली जाणार लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : राष्ट्रीय नमुना पाहणी उपक्रमांतर्गत ...
राष्ट्रीय नमुना पाहणी उपक्रम : तपशीलवार माहिती गोळा केली जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राष्ट्रीय नमुना पाहणी उपक्रमांतर्गत केंद्र व राज्य सरकारच्यावतीने दरवर्षी विविध विषयांवर नियोजनात्मक माहिती व आकडेवारीचे संकलन केले जाते. त्यानुसार, चालू वर्षात राष्ट्रीय नमुना पाहणीच्या ७७ व्या फेरीअंतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभागामार्फत ग्रामीण व नागरी भागातील शेतकरी कुटूंबांचे आर्थिक सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी अधिकारी जे.बी. आढाव यांनी मंगळवारी दिली.
या उपक्रमांतर्गत ग्रामीण व नागरी भागातील कुटूंबांकडे असलेली जमीन, जनावरे, शेतकरी कुटूंबांनी केलेली गुंतवणूक, त्यांच्यावर असलेले कर्ज, स्थावर मालमत्ता आणि दायीत्व आदिंबाबतची तपशिलवार माहिती गोळा करण्यात येणार आहे. या पाहणीअंती निघणाºया निष्कर्षांचा उपयोग शेती व शेतकºयांसाठी भविष्यात राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर विविध धोरण व कार्यक्रम आखण्यासाठी होणार आहे. माहिती संकलनातून शेतीसंदर्भातील आगामी नियोजन अचूकपणे होण्याकरिता मदत होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक व शेतकरी कुटूंबांनी माहिती संकलनासाठी येणाºया अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिकारी, कर्मचाºयांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी आढाव यांनी केले आहे.