नोटाबंदी परिणाम आजही कायम
By admin | Published: May 7, 2017 01:29 PM2017-05-07T13:29:02+5:302017-05-07T13:29:02+5:30
शहरात आजही नोटाबंदीचा परिणाम जाणवतो. येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या पैशाचा तुटवडा आहे.
ग्राहक त्रस्त : दोन ते पाच हजाराचा विड्रॉल
मानोरा : शहरात आजही नोटाबंदीचा परिणाम जाणवतो. येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या पैशाचा तुटवडा आहे. केवळ पाच हजार रुपयांचाच विड्रॉल दिल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यापासून आजही येथभल बँकावर परिणाम आढळतो. त्यामुळे लोकांना हवे तेवढे पैसे मिळत नाही. सध्या लग्नसमारंभाची धामधुम आहे. लोकांना जास्त पैशाची गरज आहे, मात्र बॅकात पैसाच नाही, सकाळी ११ वाजतापासुन नागरिक बँकात पैशासाठी येतात दिवसभर थांबतात, कुणाला पाच, कुणाला दोन हजारावर समाधान मानावे लागते. तशीच अवस्था येथील जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या शाखेची आहे. पिककर्ज, पेन्शन, निराधारांचे अनुदान घेण्यासाठी लाभार्थी येतात. येथे लाभार्थी संख्या जास्त असल्याने तोबा गर्दी असते. त्यातच शिक्षक, कर्मचाऱ्यांचे पगार याच बँकेतुन होतात, त्यामुळे दिवसभर गर्दी असते. बरेचदा रात्री ८ वाजेपर्यंत विड्रॉलसाठी थांबावे लाते. शहरातील या दोन्ही मुख्य बाँकाच जनु कॅशलेस झाल्या आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांची आहे.
दोन्ही एटीएम बंदच
येथील भारतीय स्टेट बँकेचे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दोन्ही एटीएम बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांना पैसे काढता येत नाही. एकीकडे बँकेत पुरेसा विड्रॉल मिळत तर दुसरीकडे एटीएम मध्ये पैशाचा ठणठणाट आहे. त्यामुळे कसे व्यवहार करावे असा प्रश्न लोकांना पडला आहे.
बँकेच्या शाखेला वरुनच कॅश कमी येते.जेवढी कॅश आली तेवढी सर्व लोकांना पुरावी म्हणुन कमी विड्रॉल दिल्या जातो. ट्रेझरीला कमी पैसा येत आहे. त्यामुळे आमचा नाईला आहे. -टि.एन.धार्मिक,व्यवस्थापक, स्टेट बँक शाखा, मानोरा