सततच्या पावसाने उडदाच्या उत्पादनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:46 AM2021-09-22T04:46:39+5:302021-09-22T04:46:39+5:30

----------- एकरी एक ते दीड क्विंटलचा उतारा सुरुवातीच्या पोषक वातावरणामुळे उडदाच्या पिकातून चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु ...

Effects of continuous rains on fly production | सततच्या पावसाने उडदाच्या उत्पादनावर परिणाम

सततच्या पावसाने उडदाच्या उत्पादनावर परिणाम

Next

-----------

एकरी एक ते दीड क्विंटलचा उतारा

सुरुवातीच्या पोषक वातावरणामुळे उडदाच्या पिकातून चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु ऑगस्टच्या अखेरपासून पावसाने जिल्ह्यात धडाकाच लावला. त्यामुळे उडदावर परिणाम होऊन केवळ एक ते दीड क्विंटलपर्यंतचाच उतारा होत असल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत.

००००००००००००००

मजुरांचा खर्च परवडेना

सततच्या पावसामुळे उडदाच्या पिकाला मोठा फटका बसल्याने उत्पादनावर परिणाम झाला. शेतात पिकलेले उडदाचे पीक पाहता मजुरांकडून तोडणी करणे परवडत नसल्याने अनेक शेतकरी घरच्या मंडळीचा आधार घेऊन उडदाची काढणी करीत असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे.

०००००००००००००००

शेतकरी म्हणतात खर्च वसूल हाेणे कठीण

१) कोट:

सततच्या पावसाने उडदाच्या पिकाचा सत्यानाश केला. त्यात रानडुकरांनी हैदोस घालून उरलेसुरले पीकही फस्त केले. त्यामुळे या पिकातून काहीच उत्पन्न मिळण्याची आशा नसल्याने खर्च वसूल होणार तरी कसा, वनविभागाने नुकसानाची पाहणी करून मदत द्यावी.

-देवानंद उपाध्ये

उडीद उत्पादक, शेतकरी

०००००००००००००००

२) कोट:

उडिदाच्या पिकाला भाव मिळत नसल्याने, तसेच या पिकाला वन्यप्राण्यांपासून धोका असल्याने आधीच कमी पेरणी केली. त्यात पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने आता खर्च वसूल होण्याची आशाच उरली नाही.

- घनश्याम ढोक,

उडीद उत्पादक, शेतकरी

--------

उडदाचे तालुकानिहाय क्षेत्र

तालुका - उडदाचे क्षेत्र (हेक्टर)

वाशिम - ९११.००

रिसोड - १२९४.००

मालेगाव - १४०५.००

मं.पीर - ९९९.००

मानोरा - १२१९.४२

कारंजा - ११६५.६५

Web Title: Effects of continuous rains on fly production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.