ग्रामस्थाच्या सतकर्तेमुळे सोयाबीन चोरीचा प्रयत्न फसला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 08:15 PM2017-11-13T20:15:05+5:302017-11-13T20:16:58+5:30
ग्रामस्थाच्या सतर्कतेमुळे शेतातील गोठ्यात ठेवलेले सोयाबीन पोते पळविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे रविवारी मध्यरात्रीच्या नंतर हा नाट्यमय प्रकार घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पार्डी ताड: ग्रामस्थाच्या सतर्कतेमुळे शेतातील गोठ्यात ठेवलेले सोयाबीन पोते पळविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे रविवारी मध्यरात्रीच्या नंतर हा नाट्यमय प्रकार घडला.
पार्डी ताड येथील शेतकरी खंडूजी लांभाडे यांनी यंदा पिकलेले ४० पोते सोयाबीन काढून शेतातील गोठ्यात ठेवले होते. रविवार १२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजताच्यानंतर या गोठ्यातील सोयाबीनचे पोते पळविण्याचा प्रयत्न तीन चोरट्यांनी केला. त्यांनी लांभाडे यांच्या गोठ्यात ठेवलेल्या सोयाबीनच्या ४० पोत्यांपैकी ९ पोते बाहेर काढून रस्त्यावर आणले. हे तिन्ही चोरटे तोंडाला कापड बांधून हा प्रकार करीत होते. त्यावेळी गावातील माणिक लामगे यांना हा प्रकार दिसला. त्यांनी लगेचच आरडाओरड करून गावकºयांना सतर्क केल्यामुळे तिन्ही चोरटे दुचाकीवर बसून पसार झाले. या प्रकारामुळे पार्डी ताड येथील शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी यासाठी ग्रामीण भागात गस्त सुरू करणे आवश्यक असल्याचे मत शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी वृत्तलिहित असेपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.