महारेशीम अभियानातून रेशीम शेतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:53 AM2020-01-01T11:53:10+5:302020-01-01T11:53:17+5:30
रेशीम लाभार्थींची नाव नोंदणी करण्यासाठी राज्यात ७ जानेवारी त े २१ जानेवारी २०२० या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे.
वाशिम : राज्यातील रेशीम शेतीचे महत्त्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरिता प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी तसेच सन २०२० मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थींची नाव नोंदणी करण्यासाठी राज्यात ७ जानेवारी त े २१ जानेवारी २०२० या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे.
रेशीम उद्योग हा कृषी व वन संपत्तीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. महाराष्ट्रातील हवामन या उद्योगास पोषक असल्यामुळे रेशीम उत्पादन करण्यास राज्यात भरपूर वाव आहे. ग्रामीण भागातील शेतकºयांचा आर्थिक स्तर व जीवनमान उंचावण्यास मदत करणारा हा उद्योग आहे; परंतु शेतकºयांना या उद्योगाची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या उद्योगाकडे वळलेले नाहीत. या पृष्ठभूमीवर व्यापक प्रमाणात जनजागृती करणे आणि तुती लागवड करण्यासाठी शेतकºयांची नोंदणी करणे या दुहेरी उद्देशाने राज्यात महारेशीम अभियान राबविले जाते. नववर्षात सदर अभियान ७ ते २१ जानेवारी या कालावधीत वाशिमसह राज्यात राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत रेशीम शेती म्हणजे काय, या शेतीचे महत्त्व, बाजारपेठेची उपलब्धता, तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थींची नाव नोंदणी केली जाणार आहे. जनजागृतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेचे सहकार्य घेतले जाणार आहे.