आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये ईद मिलन सोहळा

By admin | Published: July 17, 2017 02:33 AM2017-07-17T02:33:47+5:302017-07-17T02:33:47+5:30

शिरखुर्म्याचे वितरण: ५२ गावांच्या पोलीस पाटलांसह प्रतिष्ठितांची उपस्थिती

Eid Milan Session at Asgaon Police Station | आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये ईद मिलन सोहळा

आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये ईद मिलन सोहळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव : येथील पोलीस स्टेशनच्या आवारात रविवार १६ जुलै रोजी ईदमिलन उत्साहात पार पडला. कार्यक्रमात सर्व समाजबांधवांना पोलिसांच्यावतीने शिरखुर्मा वितरित करण्यात आला.
आसेगांव पोलीस स्टेशनच्या आवारात रविवार १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ईदमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ठाणेदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात सरपंच अकबर पटेल, उपसरपंच सत्तार शाह, मनवर खान, जाहिद खान पटेल, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष इरफान शेख, विष्णू चव्हाण, माजी मुख्याध्यापक ताहिर अली खान, शाकिर शेख, दाऊद खान, संदीप ठाकरे, विष्णू फड, पुंडलिक पाटील, मुदस्सिर खान, हाजी गफ्फार कुरैशी, विस्तार अधिकारी हाजी अब्दुल गनी, विशाल धानोरकर, दिनेश चव्हाण. फिरोज पटेल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ.अशफाक शेख, डॉ.उकंडा राठोड, रहेमान पटेल, नूर खान पटेल, नारायण जाधव आणि सुभाष कावरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर राठोड यांनी केले.
यावेळी बोलताना ठाणेदार विनायक जाधव म्हणाले, की कोणत्याही सणउत्सवात भेदभाव दूर सारून आयोजित केले जाणारे मेळाव्याचे कार्यक्रम सामाजिक एकता व अखंडतेचे प्रतिक ठरतात. यापुढेही रमजान ईदप्रमाणेच आगामी गणेशोत्सव, बकरी-ईद आणि दुर्गोत्सवासारख्या धार्मिक उत्सवातही परंपरा कायम राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गिराटा, गोस्ता, जगदंबा, खर्डा, चिखलागड, गिर्डा, रणजीतनगर, उज्वल नगर, वार्डा, साळंबी, सावरगांव, भिलडोंगर, खापरदरी, हळदा, विळेगांव, खांबाळा, रुई, पाळोदी, ढोनी, शेंदुरजना, चिंचोली, दाभडी, रामगड, मथुरा, भडकुंभा, वटफळ, मेंद्रा, इंगलवाडी, हिवरा, सनगांव, शेगी, चिचखेडा, रामगांव, मोतसावंगा, ईचोरी, फालेगांव, सार्सी, मसोला, दस्तापूर, बिटोडा, कळंबा, कासोळा, धानोरा, नांदगाव, शिवणी, लही, वसंतवाड़ी, वारा जहांगीर , देपूळू, कुंभी, आसेगांव आणि पिंपळगाव या ५२ गावचे पोलीस पाटील, सरपंच, ग्राम सचिव, तसेच प्रतिष्ठीत नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

Web Title: Eid Milan Session at Asgaon Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.