मेडशी येथे आठ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:43 AM2021-05-08T04:43:37+5:302021-05-08T04:43:37+5:30
०००००० मास्कच्या विक्रीत पुन्हा वाढ वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत चढउतार आहेत. यामुळे ...
००००००
मास्कच्या विक्रीत पुन्हा वाढ
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत चढउतार आहेत. यामुळे तोंडाला मास्क वापरणे प्रशासनाने बंधनकारक केल्याने मास्कच्या विक्रीत वाढ झाली.
00
नव्या बॅरेजेसच्या मंजुरीची प्रतीक्षा
वाशिम : जिल्ह्यातील अडाण नदीवर बॅरेज निर्मितीचा प्रस्ताव आहे. या बॅरेजला सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. याला मंजुरी केव्हा मिळणार, याकडे लक्ष लागून आहे.
00
बालकांची आधार नोंदणी प्रभावित
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची आधार नोंदणी प्रभावित झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेक बालकांची आधार नोंदणी झाली नाही.
00
शेलूबाजार येथे एक कोरोना रुग्ण
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे आणखी एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
०००००००००००००००००
रोहित्र बदलून देण्याची मागणी
वाशिम : रिठद जिल्हा परिषद गटातील नादुरुस्त विद्युत रोहित्र बदलून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी शुक्रवारी महावितरणकडे केली. गेल्या महिनाभरापासून काही रोहित्र नादुरुस्त असल्याने वीजपुरवठा अधूनमधून खंडित होत आहे.
000000000000000000
शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ११ वाजेनंतर दुकाने सुरू ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुषंगाने विशेष वॉच ठेवला जात असून शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे दिसून येत आहे.
0000000000000
वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई
वाशिम : वाशिम येथून मालेगावकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या अमानी महामार्ग पोलीस केंद्राकडे स्पीड गन व्हॅन उपलब्ध असून त्याद्वारे मंगळवार आणि बुधवारी नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
0000000000000000
रस्त्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित
वाशिम : शहरातील समतानगर, अल्लाडा प्लॉट परिसरात अंतर्गत रस्तेच नाहीत. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी होत आहे.
00000000000000
रिक्त पदे भरण्याची मागणी
वाशिम : उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तुलनेने अपुरे मनुष्यबळ आहे. यामुळे कामकाज वारंवार प्रभावित होऊन नागरिकांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेता रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
00000000000000000
सुरकंडी रस्त्यावर खड्डे; चालक त्रस्त
वाशिम : येथून चार किमी अंतरावर असलेल्या सुरकंडी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही अद्याप खड्डे बुजविण्यात आले नाहीत.
00000000000000
नालीची दुरवस्था; पालिकेचे दुर्लक्ष
वाशिम : नवीन आययूडीपी कॉलनी परिसरातील काही ठिकाणच्या नाल्यांची दुरवस्था झालेली आहे. यामुळे सांडपाणी जागीच थांबून दुर्गंधी सुटत आहे. वारंवार मागणी करूनही नगर परिषदेकडून नाल्यांची स्वच्छता केली जात नाही.
000000000000000000
जिल्हा परिषदेत थर्मल गनने तपासणी
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक जिल्हा परिषद कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची थर्मल गनद्वारे तपासणी केली जात आहे. यामुळे सुरक्षितता बाळगणे शक्य झाले आहे.