आठ ग्रामसेवकांवर ताशेरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 02:43 AM2017-07-30T02:43:04+5:302017-07-30T02:44:06+5:30

eight gramsevaks criticized | आठ ग्रामसेवकांवर ताशेरे!

आठ ग्रामसेवकांवर ताशेरे!

Next
ठळक मुद्देमंगरूळपीर येथे आढावा बैठकहगणदरीमुक्तीबाबत सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर: शौचालयाचे फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड न करणाºया तालुक्यातील ८ ग्रामसेवकांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढत, या ग्रामसेवकांची सीईओंच्या दालनात हजेरी लावण्यात आली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी दिली. मंगरुळपीर पंचायत समितीमध्ये सर्व मिनी बीडीओ आणि ग्रामसेवक यांच्या पाणी गुणवत्ता व स्वच्छता बाबत शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत मंगरुळपीर तालुका येणाºया २ आॅक्टोबरला अर्थात महात्मा गांधी जयंतीला हगणदरीमुक्त करण्याच्या सूचना स्वच्छ भारत मिशनचे (ग्रामीण) इस्कापे यांनी दिले. यावेळी गटविकास अधिकारी खैरे, विस्तार अधिकारी शेळके आणि पद्मने यांच्यासह जिल्हा कक्षाचे राम शृृंगारे, रविचंद्र पडघान, अभिजित दुधाटे यांची उपस्थिती होती. ग्रामसेवकांकडून ग्रामपंचायतनिहाय शौचालयाचे किती शोषखड्डे खोदण्यात आले आणि किती शौचालयाचे बांधकाम झाले, याचा आढावा घेण्यात आला. याबाबत दररोज माहिती घेऊन जिल्हा कक्षाला कळविण्याच्या सूचना गटविकास अधिकारी खैरे यांना दिल्या. तालुक्यातील सर्व गावात गुडमॉर्निंग मोहीम सक्रिय करण्याच्या व काही गावात गटविकास अधिकारी आणि मिनी बीडीओ यांनीसुद्धा गुडमॉर्निंग पथकासोबत जाण्याचे निर्देश दिले.
तालुक्यातील भडकुंभा, चेहेल, कळंबा बोडखे, माळशेलू, मोतसावंगा, नांदगाव, पिंप्री बु. आणि तपोवन बु. या ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत एकही फोटो अपलोड केला नाही, ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगून इस्कापे यांनी संबंधित ग्रामसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली.

Web Title: eight gramsevaks criticized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.