जिल्ह्यात आणखी आठ कोरोना ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:09 AM2021-01-08T06:09:25+5:302021-01-08T06:09:25+5:30
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी असल्याचे चार दिवसांच्या अहवालावरून तूर्तास दिसून येते. सोमवारी आठ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह ...
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी असल्याचे चार दिवसांच्या अहवालावरून तूर्तास दिसून येते. सोमवारी आठ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील नालंदानगर येथील १, काटा येथील २, मालेगाव तालुक्यातील अमाना येथील १, खंडाळा येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील २, निंबी येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ६,७१० वर पोहोचला आहे. सोमवारी १८ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे गावोगावी शिबिरे घेऊन संदिग्ध नागरिकांची कोरोना चाचणी करण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाचा आलेख खाली येत असला तरी धोका अजून पूर्णपणे संपलेला नसल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना नेहमी मास्क किंवा रुमालचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
१२४ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ६,७१० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,४३५ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
०००
गृहविलगीकरणाला पसंती
साैम्य लक्षणे असलेले रुग्ण खासगी किंवा सरकारी काेविड हाॅस्पिटलपेक्षा गृहविलगीकरणाला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. खासगी व सरकारी कोविड हाॅस्पिटलमध्ये ४७ जण उपचार घेत आहेत. उर्वरित ७७ रुग्णांनी गृहविलगीकरणाला पसंती दिली आहे.