अवैध धान्य साठ्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:34 AM2021-01-15T04:34:13+5:302021-01-15T04:34:13+5:30
मंगरुळपीर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी रुपाली केशवराव सोळंके यांनी १४ जानेवारी रोजी पोलिसांत तक्रार दिली की, ...
मंगरुळपीर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी रुपाली केशवराव सोळंके यांनी १४ जानेवारी रोजी पोलिसांत तक्रार दिली की, ७ जानेवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पंचशील नगर,मूर्तिजापूर येथील गोदामात अवैध धान्यसाठा आहे. यानुसार याठिकाणी धाड टाकून गहू २३२.५३ क्विंटल, तांदूळ ८९.२५ क्विंटल, मसूर डाळ ४५.२५ क्विंटल, चना ०५ क्विंटल, चना डाळ ८.३० क्विंटल याप्रमाणे धान्यसाठा जप्त करण्यात आला. तसेच शासकीय रिकामा ज्यूट बारदाना अंदाजे ५० किलोचे १५४ कट्टे व १०० किलोचे १५० कट्टे जप्त करण्यात आले. त्या अनुषंगाने धान्याचे मालक जय किसान ट्रेडिंग कंपनीचे चार भागीदार श्यामसुंदर बाहेती, नफीज खान अजीज खान, विनोद पुंडलीकराव जाधव व जुबेर फिरोज मोहनावाले तसेच वाहन क्र. टी .एस .१६ यु .बी. ५३९८ चा चालक आकाश मोरे व वाहन क्रं. एम. एच. ३७ टि. १५९८ चा चालक मुमताज खान शौकत खान या दोन्ही वाहनांचे मालक यांचेविरुध्द कलम ३,७ अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पीएसआय संतोष आघाव करीत आहेत.