आययुडीपी कॉलनी येथे आठ पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:42 AM2021-04-20T04:42:54+5:302021-04-20T04:42:54+5:30

०००० प्रतिबंधित क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण वाशिम : जिल्ह्यात १४० च्या वर प्रतिबंधित क्षेत्र असून, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ...

Eight positives at IUDP Colony! | आययुडीपी कॉलनी येथे आठ पॉझिटिव्ह !

आययुडीपी कॉलनी येथे आठ पॉझिटिव्ह !

googlenewsNext

००००

प्रतिबंधित क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण

वाशिम : जिल्ह्यात १४० च्या वर प्रतिबंधित क्षेत्र असून, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणी केली आहे.

००००००

पाणीपुरवठा योजनांचे देयक अदा करा

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणी पुरवठा योजनांचे कोट्यवधी रुपयांचे विद्युत देयक थकीत आहे. यामुळे महावितरण आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून, ग्रामपंचायतींनी देयक अदा करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी केले.

००

अतिक्रमणाचा प्रश्न झाला गंभीर

वाशिम : शहरातील शिवाजी नगरमधील सर्व्हे नं. ३९४/१ मधील खुल्या जागेवर झालेले अतिक्रमण नगर परिषदेने गेल्यावर्षी हटविले; मात्र त्याच जागेवर आता पुन्हा अतिक्रमण झाले असून, ते हटविण्यासाठी या भागातील नागरिक एकवटले आहेत.

००

काटा येथे १३ कोरोना पॉझिटिव्ह

वाशिम : वाशिम तालुक्यातील काटा येथेही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, सोमवारी यामध्ये आणखी १३ ची भर पडली. नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.

०००

अरुंद रस्त्यावरून धावताहेत वाहने

वाशिम : पाटणी चौक ते अकोला नाका रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे मधला मार्ग म्हणून वाहनधारकांनी मंत्री पार्कजवळून जनता बँकेजवळ निघणाऱ्या रस्त्याचा पर्याय निवडला आहे; मात्र सदर रस्ता अरुंद असल्याने गैरसोय होत आहे.

०००

कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले

वाशिम : गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागाने आरटीपीसीआर, अ‍ॅन्टिजन चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. यांसह व्यापाऱ्यांनीही कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले.

००००

प्लास्टिक बंदीचा फज्जा

वाशिम : शहरी भागामध्ये बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, यादृष्टीने कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिक पिशव्यांमध्ये साहित्य दिले जात असल्याने प्लास्टिक बंदीचा फज्जा उडत आहे.

००००

केकतउमरा येथे तपासणी मोहीम

वाशिम : वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने गत पाच दिवसांपासून आरोग्य सर्वेक्षण व तपासणी केली जात आहे. सोमवारीदेखील येथे पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले.

००००

मास्क न लावता ग्रामस्थांचा संचार

वाशिम : ग्रामीण भागात अनेक जण मास्क न लावताच फिरत असल्याचे अनसिंग, तोंडगाव, किनखेडा या परिसरात रविवार, सोमवारी दिसून आले. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी प्रशासन व्यापक उपाययोजना करीत आहे; परंतु जनतेचे मात्र अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे दिसते.

Web Title: Eight positives at IUDP Colony!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.