वाशिमला पाणीपुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:58 PM2018-08-07T13:58:50+5:302018-08-07T14:00:15+5:30
वाशिम : शहराला पाणीपुरवठा करणारा एकबुर्जी मध्यम प्रकल्प सद्या ‘ओव्हरफ्लो’ होवून ओसंडून वाहायला लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहराला पाणीपुरवठा करणारा एकबुर्जी मध्यम प्रकल्प सद्या ‘ओव्हरफ्लो’ होवून ओसंडून वाहायला लागला आहे. यामुळे वाशिमच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघण्यासोबतच आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळणार असल्याने शेतकºयांमध्ये तद्वतच पर्यटकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाशिमच्या एकबुर्जी या मध्यम प्रकल्पाची पाणीसाठवण क्षमता ११.९७ दशलक्ष घनमीटर असून सद्य:स्थितीत प्रकल्पाने ही पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालेल्या एकबुर्जी प्रकल्प परिसरात प्रशासनाकडून लहान मुलांची खेळणी बसविण्यासोबतच अन्य स्वरूपातील विकासही केला आहे. त्यामुळे शहर परिसरातील पर्यटकांना प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होण्याची प्रतीक्षा लागून असते. ती गरज भागल्यामुळे यापुढे प्रकल्प परिसरात पर्यटकांची गर्दी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.